• भंगारवाल्यांनी गिळला रस्ता
  • भंगारवाल्यांनी गिळला रस्ता
  • भंगारवाल्यांनी गिळला रस्ता
SHARE

दहिसर - दहिसर पूर्वमधील शैलेंद्र नगरच्या भंगारवाल्यांनी हायवे आणि सर्व्हिस रोडवर अतिक्रमण केले आहे. याचा त्रास मोठ्या प्रमाणात इथून प्रवास करणाऱ्या नागरिकांना होत आहे. दहिसर पूर्व शैलेंद्र नगर आणि अकबर मार्केट या परिसरात नागरिक भंगारचा व्यवसाय करतात. आणि भंगाराचे संपूर्ण सामान ते रस्त्यावर ठेवतात. याचा त्रास शाळेत जाणाऱ्या मुलांपासून, ते कामावर जाणाऱ्या प्रवाशांपर्यंत सर्वांना होत आहे. याबाबतीत वारंवार तक्रार करुनही याकडे पालिका लक्ष देत नसल्याचा आरोप इथल्या रहिवाशांनी केला आहे.

संबंधित विषय
ताज्या बातम्या