SHARE

मुंबई – पेंग्विन मृत्यू प्रकरण थेट लोकायुक्तांकडे गेले आहे. शुक्रवारी झालेल्या सुनावणीत पेंग्विनला परत मायदेशी पाठवा असे आदेश त्यांनी दिले. पेंग्विनसाठी मुंबईतील वातावरण पोषक नसताना, त्यांच्यासाठी आवश्यक त्या सोयीसुविधा नसताना पेंग्विन आणलेच कसे? असा जाब पालिकेला विचारला असल्याची माहिती तक्रारदार पालिकेतील विरोधी पक्षनेते प्रविण छेडा यांनी दिली आहे. लोकायुक्तांच्या या निर्णयामुळे आता पालिका चांगलीच अडचणीत येणार असल्याचं म्हटलं जात आहे.

'पेंग्विनसाठी नेमकं कोण जबाबदार आहे? यासंबंधीची जबाबदारी निश्चित करा' असंही आदेश लोकायुक्तांनी दिले आहेत. आता यासंबंधीची पुढील सुनावणी 15 नोव्हेंबरला होणार आहे.

संबंधित विषय
ताज्या बातम्या