Advertisement

शिवप्रतिष्ठान २८ मार्चला काढणार मोर्चा


शिवप्रतिष्ठान २८ मार्चला काढणार मोर्चा
SHARES

कोरेगाव भीमा प्रकरणात सत्य दडपण्याचा प्रयत्न केला जात असून संभाजी भिडे यांना जाणिवपूर्वक लक्ष केलं जात असल्याचा आरोप शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानने केला आहे. शिवाय संभाजी भिडेंवरील आरोप मागे घेण्यासाठी २८ मार्च रोजी जिजामाता उद्यान ते आझाद मैदान असा मोर्चा काढण्यात येईल. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानने पत्रकार संघात घेतलेल्या पत्रकार परिषदेतून ही माहिती दिली.


'आम्ही असे प्रकार करत नाही'

प्रकाश आंबेडकर या बुद्धिवाद व्यक्तींनी असे आरोप करणे दुर्देव असल्याचं सांगत शिवप्रतिष्ठानने कधीच दंगलीचा प्रकार केला नसून आमचा इतिहास तपासावा, असं आवाहन त्यांनी केलं. कोरेगाव भीमा दंगलीनंतर जे नुकसान झालं, ते ज्यांनी मोर्चा काढला त्यांच्याकडून भरून काढावं, असं सांगतानाच ज्यांनी मोर्चा काढला त्यांच्यावरील गुन्हे मागे घेऊ नये, अशी मागणी देखील यावेळी शिवप्रतिष्ठानने केली.

राजकीय फायद्यासाठीच या दंगली केल्या जात आहे. एल्गार परिषद ज्यांनी भरवली त्यांच्यावर गुन्हे दाखल करा, राहुल फटांगळे यांच्या कुटुंबीयांना सरकारने मदत करावी, अशा इतर मागण्या देखील या पत्रकार परिषदेदरम्यान करण्यात आल्या. 

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा