Advertisement

महापालिका अायुक्तांचा निषेध! निषेध! निषेध! सर्व पक्ष एकत्र


महापालिका अायुक्तांचा निषेध! निषेध! निषेध! सर्व पक्ष एकत्र
SHARES

मुंबई महापालिका आयुक्त अजोय मेहता यांच्या मनमानी कारभाराचा सर्व पक्षांनी सभागृहात निषेध नोंदवला. शिवसेनेच्या नगरसेवकांनी थेट महापालिका अायुक्तांच्या कार्यालयात धाव घेत अजोय मेहतांना घेराव घातला. शिवसेनेच्या रणरागिणींनी मेहता यांच्या कार्यालयावर हल्लाबोल केल्यानंतर अायुक्तही नाईलाजास्तव सभागृहात हजर झाले. कारण होतं महापालिकेच्या अॅपचं परस्पर उद्घाटन केल्याचं.


मनमानी कारभाराचा पुन्हा प्रत्यय

महापालिकेच्या वतीने एमसीजीएम २४×७ या मोबाईल सेवा अॅपस्टोअरचा अाणि जीअायएस संकेतस्थळाचा शुभारंभ शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाला. महापौर विश्वनाथ महाडेश्वर अाणि महापालिकेच्या गटनेत्यांना या कार्यक्रमाची कोणतीही कल्पना देण्यात अाली नव्हती. त्यामुळे अायुक्तांच्या मनमानी कारभाराचा निषेध सभागृहनेते यशवंत जाधव यांनी निवेदनाद्वारे नोंदवला. त्याला विरोधी पक्षनेते रवी राजा यांच्यासह सर्वांनीच पाठिंबा दिला. ही चर्चा सुरू असताना अाणि अनेक निरोप पाठवूनही अायुक्त उपस्थित न राहिल्यामुळे शिवसेनेच्या रणरागिणींनी अायुक्तांच्या कार्यालयावर हल्लाबोल केला.अाणि अायुक्त नरमले!

माजी महापौर विशाखा राऊत, तृष्णा विश्वासराव, राजूल पटेल, किशोरी पेडणेकर यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या महिला नगरसेवकांनी अायुक्तांना घेराव घातला. तुम्ही येताय की अाम्ही घेऊन जाऊ, अशा इशारा देताच अायुक्त नरमले अाणि सभागृहात येण्याचे अाश्वासन दिले.  

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा