सेल्फी पॉइंट राहणार तुळशी विवाहापर्यंत

 Dadar
सेल्फी पॉइंट राहणार तुळशी विवाहापर्यंत

शिवाजी पार्क - दादरच्या शिवाजी पार्क परिसरात मनसेच्या वतीनं तयार करण्यात आलेला कंदिलांचा सेल्फी पॉइंट या दिवाळीत अाबालवृद्धांचं आकर्षण ठरलाय. दादरकरांनी या सेल्फी पॉइंटला दिलेली पसंती पाहून तो तुळशी विवाहापर्यंत कायम ठेवण्यात येणार आहे. रसिकांच्या आग्रहामुळे राज ठाकरे यांनी हा निर्णय घेतल्याचं सांगितलं जातंय. यंदाचा दीपोत्सव वेगळ्या पद्धतीनं साजरा करण्याचा मनसेचा हा प्रयत्न होता आणि तरुणाईनंही या कल्पनेला भरभरून दाद दिली.

Loading Comments