Advertisement

बीएमसी कंत्राटदारावर अज्ञातांकडून गोळीबार, कुर्लामध्ये गोंधळ

कुर्ल्यातील कपाडीया नगर येथे महानगरपालिकेचे कंत्राटदार म्हणून काम करतात.

बीएमसी कंत्राटदारावर अज्ञातांकडून गोळीबार, कुर्लामध्ये गोंधळ
SHARES

कुर्ला पश्चिममध्ये सोमवारी गोळीबाराची (Firing in Kurla) घटना घडली आहे. मुंबई पालिका (Mumbai Municipal Corporation) कंत्राटदारावर दोन अज्ञातांकडून गोळीबार (Firing by Unknowns) करण्यात आला.

कामावरुन घरी परतत असताना अचानक दोन अज्ञातांनी गाडीवर गोळीबार केला. या घटनेनं परिसरात खळबळ माजली आहे. 

सूरज प्रतापसिंह असं कंत्राटदाराचं नाव असून सुदैवानं ते सुखरुप आहेत. गोळीबारात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आलेली आहे. 

कुर्ल्यातील कपाडीया नगर येथे महानगरपालिकेचे कंत्राटदार म्हणून काम करणारे सूरजप्रताप सिंह कामावरुन घरी परतत होते. काम आटपून कुर्ल्याहून ते बोरीवलीला असलेल्या आपल्या राहत्या घराच्या दिशेनं निघाले. आपल्या इनोव्हा क्रिस्टा गाडीनं त्यांनी प्रवास सुरू केला.

एवढ्यातच कपाडीया जंक्शनजवल त्यांची गाडी पोहोचताच दोन अज्ञात इसम त्याठिकाणी आले आणि त्यांनी सूरज प्रतापसिंह यांच्या गाडीवर गोळीबार केला. काही राऊंड फायरिंग केल्यावर दोन्ही अज्ञात इसमांनी तिथून पोबारा केला.

सूरज प्रतापसिंह आणि त्यांचा ड्रायव्हर दोघेही सुखरुप आहेत. घटनेनंतर सूरज प्रतापसिंह यांनी पोलीस स्थानक गाठून घडल्या प्रकाराची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी सदर प्रकरणी तक्रार दाखल करुन घेतली आहे. 



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा