दिशादर्शक जमीनदोस्त

 Goregaon
 दिशादर्शक जमीनदोस्त

गोरेगाव - बाहेरून येणारे प्रवासी, वाहनचालक यांना इच्छित स्थानी अचू्कपणे पोहोचता यावे, यासाठी दिशादर्शक फलक लावले जातात. पण गोरेगाव पश्चिमेतील एस.व्ही रोडजवळील स्वामी विवेकानंद मार्गावरील दिशादर्शक फलक जमीनदोस्त झाले आहेत.

देवछाया बिल्डिंगसमोर लावलेला दिशादर्शक फलक बोरिवलीच्या दिशेने जाण्याऱ्या वाहनांना दिशा दाखवण्याचे काम करतो. पण हे फलक तुटल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. याबाबत पालिका प्रशासनाकडे विचारणा केली असता, पडलेल्या दिशादर्शकांची लवकरच दखल घेऊन पालिका त्यात सुधारणा करेल, अशी माहिती पालिकेच्या पी दक्षिण विभाागाने दिली आहे.

Loading Comments