Advertisement

मानखुर्द: झोपडपट्टी कोसळून सहा जणांचा मृत्यू

काही जण जखमी असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मानखुर्द: झोपडपट्टी कोसळून सहा जणांचा मृत्यू
SHARES

मानखुर्दमध्ये झोपडपट्टी कोसळल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेत 6 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर काही जण जखमी असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

ग्राउंड प्लस दोन असे स्ट्रक्चर असलेली झोपडी कोसळली आहे. या घरामध्ये चार ते पाच जण अडकण्याची भीती वर्तवली जात होती. अशातच या घटने सहा जणांचा मृत्यू झाला आहे.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दल आणि स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. मानखुर्दमध्ये जी+3 चाळीचा भाग कोसळला आहे. यामध्ये 4 ते 5 जण अडकल्याची भीती व्यक्त केली जात होती साडे आठ वाजण्याच्या सुमारास हनुमान मंदिरामागील जनता नगर परिसरात तळमजला अधिक तीन मजली (G+3) चाळीच्या इमारतीचा काही भाग कोसळल्याची घटना घडली आहे.

प्राथमिक माहितीनुसार, चाळ क्रमांक 5 मधील दोन ते तीन घरांचा भाग कोसळला असून, ढिगाऱ्याखाली 4 ते 5 जण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत होती.

घटनास्थळी अग्निशमन दल, पोलीस, संबंधित विभागाचे कर्मचारी तसेच 108 रुग्णवाहिका सेवा दाखल झाली असून, शोध आणि बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. अखेर या दुर्घटनेत सहा जणांचा मृत्यू झाला आहे. 

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा