विक्रोळीत चौकाला दुर्गामातेचं नाव

 Dadar (w)
विक्रोळीत चौकाला दुर्गामातेचं नाव
विक्रोळीत चौकाला दुर्गामातेचं नाव
विक्रोळीत चौकाला दुर्गामातेचं नाव
See all

जनता मार्केट - विक्रोळी पूर्वेच्या जनता मार्केट परिसरातील एका चौकाला दुर्गामातेचं नाव देण्यात आलंय. नवसाला पावणारी अशी ख्याती या मातेची आहे. याच चौकात दरवर्षी मातेची पूजा केली जाते. त्यामुळे चौकाचं नामकरण करण्याचा प्रस्ताव मनसे नगरसेविका प्रियंका श्रृंगारे यांनी महापालिकेकडे पाठवला होता. प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर या चौकाचं नामकरण विक्रोळीची दुर्गामाता चौक असं करण्यात आलं. या कार्यक्रमाला काँग्रेस नगरसेवक आणि प्रभाग समिती अध्यक्ष सुरेश कोपरकर,मनसेचे माजी आमदार मंगेश सांगळे, मनसे नेते शिरीष सावंत आदींच्या उपस्थितीत या चौकाचं नामकरण करण्यात आलं.

Loading Comments