Advertisement

शिवाजी पार्कचा होणार कायापालट, ६ कोटींचा प्रस्ताव मंजूर

राज्य सरकारनं शिवाजी पार्कच्या सुधारणेसाठी ६ कोटींचा प्रस्ताव मंजूर केलाय.

शिवाजी पार्कचा होणार कायापालट, ६ कोटींचा प्रस्ताव मंजूर
SHARES

शिवाजी पार्क (Shivaji park)चा लवकरच कायापालट होणार आहे. न्यूयॉर्कमधील सेंट्रल पार्क आणि लंडनच्या हाईड पार्कच्या धर्तीवर शिवाजी पार्कचा विकास करण्यात येणार आहे. यासाठी राज्य सरकारनं ६ कोटींचा प्रस्ताव मंजूर केला आहे.

राज्य सरकारनं शिवाजी पार्कच्या सुधारणेसाठी ६ कोटींचा प्रस्ताव मंजूर केलाय. या निधीच्या मदतीनं शिवाजी पार्क परिसरात वेगवेगळे प्रकल्प राबवले जातील. येथील मैदानातून उठणाऱ्या धुळीचा बाजूला राहणाऱ्या नागरिकांना त्रास होतो. तसंच हवा प्रदूषणही मोठ्या प्रमाणात होतं. त्यामुळे ही बाब लक्षात घेऊन वाढत्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी शिवाजी पार्कच्या मैदानात सुधारणा केली जाणार आहे.

रेन वॉटर हार्वेस्टिंगचा प्रकल्प उभारून याच पाण्याच्या मदतीनं शिवाजी पार्कची माती ओली केली जाईल. त्यामुळे हवेत उठणारी धूळ कमी होण्यास मदत होणार आहे. तसंच, शिवाजी पार्कमैदानावर स्ट्रॉम वॉटर ड्रेन तयार केली जाणार आहे.

शिवाजी पार्क मुंबईतील मुख्य भाग असल्यामुळे या परिसरात चाकरमानी आणि इतर नागरिकांची नेहमीच वर्दळ असते. या योजनेंतर्गत पादचाऱ्यांसाठी नवी व्यवस्था तयार केली जाणार आहे. विशेष म्हणजे शिवाजी पार्क परिसरात हा सर्व बदल करताना सध्या असलेल्या खेळाडुंच्या पॅचेसमध्ये कोणताही बदल केला जाणार नाही.



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा