कुरारच्या पश्चिम द्रुतगतीमार्गाखालील भूयारी मार्गाचं होणार रुंदीकरण

 Dindoshi
कुरारच्या पश्चिम द्रुतगतीमार्गाखालील भूयारी मार्गाचं होणार रुंदीकरण

दिंडोशी - मालाड पूर्व तसंंच पश्चिम द्रुतगती महामार्गाखालील दफ्तरीरोड आणि कुरारगावला जोडणारा मुख्य भूयारी रस्ता चिंचोळा आहे. त्यामुळे हा भूयारी रस्ता रुंदकरणाची मागणी नागरिक सातत्याने करत होते. त्यानुसार आमदार सुनील प्रभू यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदनाद्वारे या भूयारी मार्गाच्या रुंदीकरणाची मागणी केली होती. अखेर तीन जानेवारीला या भूयारी मार्गाचा शुभारंभ खासदार गजानन कीर्तीकर यांच्या हस्ते झाल्यानंतर रुंदीकरणाच्या कामाला सुरुवात होणार आहे.

'हा भूयारी मार्ग आता चौपदरी होणार आहे, त्यामुळे पादचाऱ्यांना ये-जा करण्यासाठी स्वतंत्र पादचारी मार्ग उपलब्ध होतील, चार मीटर उंच असणाऱ्या या भूयारी मार्गाखालून अवजड वाहने सहज जातील. तसंच भूयारी मार्गातील रस्ता सिमेंट-काँक्रिटचा असेल, अशी माहिती आमदार सुनील प्रभू यांनी दिली.

Loading Comments