Advertisement

'केईएम'मध्ये आपत्कालीन आणि गंभीर रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया


'केईएम'मध्ये आपत्कालीन आणि गंभीर रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया
SHARES

मुंबईत सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक असून सध्यस्थितीत कोरोनाग्रस्तांवर सर्वच रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. महापालिकेपासून खासगी रुग्णालयातील डॉक्टर, नर्स या कोरोनाग्रस्तांवर उपचार करण्यात व्यग्र आहेत. अशा परिस्थितीत नॉन कोव्हिड रुग्णांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मध्यंतरीच्या काळात कोरोनाग्रस्तांमुळं नॉन कोव्हिड रुग्णांना रुग्णालयात जागा न दिल्याच्या घटना घडत होत्या. मात्र, महापालिकेच्या केईएम रुग्णालयात मात्र कोणत्याही गंभीर रुग्णाला परत पाठवले जात नाही. रुग्णालयाच्या ओपीडीत रोज किमान १० ते १२ रुग्ण दाखल होत आहेत. त्यांच्यावर आपत्कालीन आणि गंभीर रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया केल्या जात आहेत.

केईएम रुग्णालयातील न्युरोलॉजी विभागातील डॉक्टरांनी सर्व वयोगटातील नॉन कोव्हिड गंभीर रुग्णांवर गेल्या ४ महिन्यांत एकूण ६६ शस्त्रक्रिया केल्या आहेत. दररोज किमान २ शस्त्रक्रिया केल्या जात आहेत. सर्व वयोगटातील म्हणजेच काही दिवसांपूर्वी जन्मलेल्या बाळापासून ते ७० वयोगटातील ज्येष्ठ नागरिकांवर गंभीर शस्त्रक्रिया करुन त्यांचा जीव वाचवण्यात डॉक्टरांना यश आले आहे. यात जवळपास ८ ते ९ बाळांचा समावेश आहे.

सर्व १४ ते ७० वयोगटातील असल्याचं रुग्णालयानं स्पष्ट केलं. यात ब्रेन ट्युमर, डोक्याला लागलेला मार, कर्करोग, पक्षाघात, स्पाईनच्या समस्या, स्पॉन्डेलिसीस, मेंदूत रक्ताच्या गुठळ्या, ब्रेन हेमरेज अशा महत्वाच्या आणि गंभीर शस्त्रक्रियांचा समावेश आहे. जन्मतःच मेंदूत रक्तस्राव होणं, कंबरेला गाठ येणं अशा गंभीर स्वरूपाच्या किमान ८ ते ९ शस्त्रक्रिया केल्याची माहिती मिळते.



हेही वाचा -


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा