Advertisement

मुंबईला पाणीपुरवठा करणारे तानसा, मोडकसागर तलाव भरले

मागील चार दिवसांपासून धरण क्षेत्रात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे तानसा आणि मोडकसागर तलाव भरून वाहू लागले आहेत.

मुंबईला पाणीपुरवठा करणारे तानसा, मोडकसागर तलाव भरले
SHARES

मुंबईकरांसाठी खुशखबर आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणारे तानसा आणि मोडकसागर तलाव पुुर्णपणे भरले आहे. मागील चार दिवसांपासून धरण क्षेत्रात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे तानसा आणि मोडकसागर तलाव भरून वाहू लागले आहेत. 

मोडकसागर पहाटे ३ वाजून २४ मिनिटाने तर तानसा पहाटे ५.४८ वाजता ओव्हरफ्लो झाले आहेत. दोन्ही तलावातून मुंबईला दररोज सुमारे ९०० दशलक्ष लिटर पाण्याचा पुरवठा होतो. मुंबईकरांना पाणीपुरवठा करणाऱ्या तलाव क्षेत्रात मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे. याआधी महापालिका क्षेत्राला पाणीपुरवठा करणाऱ्या आणि महापालिका क्षेत्रात असणारा तुळशी तलाव १६ जुलै रोजी भरला आहे. तर विहार तलाव हा १८ जुलै रोजी सकाळी ९ वाजता भरून‌‌ वाहू लागला.

महापालिकेला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांपैकी विहार तलाव हा मोठा असून तुळशी तलाव हा सर्वात लहान तलाव आहे. विहार तलावातून मुंबईला दररोज सरासरी ९० दशलक्ष लीटर एवढ्या पाण्‍याचा पुरवठा केला जातो. तुळशी तलावामधून रोज सरासरी १८ दशलक्ष लीटर पाण्‍याचा पुरवठा केला जातो. 

मुंबई शहराला पाणी पुरवठा करणारे ठाणे जिल्ह्यातील तानसा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस पडत आहे. यामुळं तानसा धरण लवकरच भरुन वाहण्याची शक्यता व्यक्त केली होती. त्यामुळे तानसा नदी काठावरील ठाणे व पालघर जिल्ह्यातील ३३ गावांना सावधानतेचा इशारा मुंबई महानगरपालिकेने दिला होता. पावसाच्या या कालावधीत धरणाखालील नदी पात्रात न जाण्याचं सूचित करण्यात आलं आहे.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा