Advertisement

तानसाही भरलं


तानसाही भरलं
SHARES

तुळशी, मोडकसागर आणि विहार तलाव ओसंडून वाहिल्यानंतर तानसा धरणही मंगळवारी सकाळी भरुन वाहू लागलं. मागील वर्षी तानसा धरण १८ जुलै रोजी भरलं होतं. पण यंदा एक दिवस आधीच हा मुहूर्त साधला. तानसा धरणातून मुंबईला दरदिवशी ३८५ दशलक्ष लिटर्स पाण्याचा पुरवठा केला जातो. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या ७ धरणांपैकी ४ धरणं अाता ओसंडून वाहू लागली अाहेत.


७ पैकी ४ धरणं भरली

मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तानसा, अप्पर वैतरणा, मोडकसागर, विहार, तुळशी, मध्य वैतरणा आणि भातसा आदी धरणांमधून दरदिवशी ३७५० दशलक्ष पाण्याचा पुरवठा केला जातो. रविवारी मोडकसागर तलाव भरल्यानंतर सोमवारी विहार तलावही भरला.  त्यानंतर मंगळवारी सकाळी सव्वा सहा वाजता हा तलाव भरला. मुंबईला पाणीपुरवठा या सातही धरणांमध्ये सध्या १० लाख ३४ हजार ५७१ लक्ष लिटर्स एवढा पाण्याचा साठा जमा आहे. एकूण ७१.४८ टक्के एवढा हा पाणीसाठा आहे.


हे तलाव भरले

०९ जुलै, २०१८ रोजी तुळशी तलाव सकाळी ७.३० वाजता
 १५ जुलै, २०१८ रोजी मोडकसागर तलाव दुपारी ३.०५ वाजता
१६ जुलै, २०१८ विहार तलाव सकाळी १०.३० वाजता
१७ जुलै, २०१८ मोडकसागर तलाव सकाळी ६.१५ वाजता

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा