Advertisement

मध्य वैतरणा ओव्हरफ्लो, तलावाची पातळी 89 टक्क्यांवर

पाणलोट क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे त्यांची जलपातळी झपाट्याने वाढली आहे.

मध्य वैतरणा ओव्हरफ्लो, तलावाची पातळी 89 टक्क्यांवर
SHARES

मध्य वैतरणा (middle vaitarna) धरण रविवारी पहाटे 2:45 वाजता ओव्हरफ्लो (overflow) होऊ लागले. जे मुंबई महानगर प्रदेशाला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांपैकी एक धरण आहे. पाणलोट क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे त्यांची जलपातळी झपाट्याने वाढली आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (bmc) जल अभियांत्रिकी विभागाच्या म्हणण्यानुसार धरण (dam) ओव्हरफ्लो होऊ लागल्यानंतर त्याचे दोन दरवाजे उघडण्यात आले. 706.30 क्युसेकने धरणातून पाणी सोडण्यात आले.

तुळशी, विहार, मोडकसागर आणि तानसा तलाव गेल्या महिन्यात ओसंडून वाहू लागले होते, त्यानंतर महापालिकेने 10% पाणीकपात मागे घेतली.

'हिंदुहृदयसम्राट शिवप्रमुख बाळासाहेब ठाकरे मध्य वैतरणा जलाशय' असे नाव असलेल्या मध्य वैतरणा धरणाचे काम महापालिकेने 2014 मध्ये विक्रमी वेळेत पूर्ण केले. हे धरण 102.4 मीटर उंच आणि 565 मीटर लांब असून त्याची कमाल पाणी साठवण्याची क्षमता 5319 दशलक्ष लिटर इतकी आहे. 

मुंबईला (mumbai) पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांची एकूण साठवण क्षमता 14,47,363 दशलक्ष लिटर आहे. रविवारी सकाळी 6 वाजता सात तलावांची एकत्रित पाणी पातळी 12,89,615 दशलक्ष लिटर किंवा एकूण क्षमतेच्या 89.1% होती, जी गेल्या वर्षी याच दिवशी 11,47,086 दशलक्ष लिटर इतकी होती.



हेही वाचा

गणेशोत्सव मंडळांना मंडपासाठी 5 वर्षांची परवानगी

लोखंडवाला-यारी रोडला जोडणाऱ्या नवीन पुलासाठी मार्ग मोकळा

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा