Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
51,79,929
Recovered:
45,41,391
Deaths:
77,191
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
40,162
1,717
Maharashtra
5,58,996
40,956

SBI ग्राहकांनो! 'हे' काम लवकर करा, नाहीतर खातं होईल बंद

भारतीय स्टेट बँक (एसबीआय)च्या ग्राहकांसाठी महत्वाची बातमी आहे.

SBI ग्राहकांनो! 'हे' काम लवकर करा, नाहीतर खातं होईल बंद
SHARES

भारतीय स्टेट बँक (SBI)च्या ग्राहकांसाठी महत्वाची बातमी आहे. एसबीआय ग्राहकांना त्यांच्या बँक खात्यासाठी केवायसी (KYC) २८ फेब्रुवारीपर्यंत करणं गरजेचं आहे. जर तुम्ही केवायची केलं नाही तर तुमचं खातं बंद होऊ शकतं.

KYC नसेल तर बँक खातं उघडणं आणि पैसे गुंतवणंही शक्य होत नाही. एवढंच नाही तर हा तपशील दिला नाही तर खात्यामधले बँक व्यवहारही रोखले जाऊ शकतात. तर याच संदर्भात SBI ने आपल्या ग्राहकांना SMS पाठवून अलर्ट पाठवला आहे.

KYC म्हणजे काय?

KYC अर्थात Know Your Customer म्हणजेच आपल्या ग्राहकांबाबत पूर्ण माहिती असणं. केवायसी करणं जरूरी आहे कारण त्यामुळे बँक आणि ग्राहकांमधील व्यवहार सुलभ होतात. KYC अपडेट करण्याकरता ग्राहकांना आपल्या जवळच्या SBI शाखेमध्ये जाऊन अद्ययावत कागदपत्रं द्यावी लागतील. नाहीतर भविष्यात ग्राहकांचे बँकेचे व्यवहार रोखण्यात येतील. ग्राहकांची खाती देखील बँकेकडून फ्रीज केली जातील.

केवायसीसाठी आवश्यक कागदपत्रे

बँकेच्या ग्राहकांना स्टेट बँक ऑफ इंडियाच्या जवळच्या शाखेत जाऊन केवायसीसाठी आवश्यक कागदपत्रे सादर करावी लागतील. आपण यापैकी एक दस्तावेज ओळख आणि आपल्या घराचा पत्ता पुरावा म्हणून देऊ शकता:

  • पासपोर्ट (Passport)
  • मतदार ओळखपत्र (Election Card)
  • ड्रायव्हिंग लायसन्स (Driving license)
  • आधार पत्र / कार्ड (Adhar Card)
  • नरेगा कार्ड 
  • पॅन कार्ड (Pan card)
  • राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी (एनपीआर) तर्फे जारी केलेले पत्र


अनिवासी भारतीयांसाठी

भारतीय स्टेट बँक (एसबीआय) मध्ये खाते असलेल्या परदेशी भारतीयांना (एनआरआय) त्यांच्या पासपोर्टची आणि निवासी व्हिसाची प्रत द्यावी लागेल. हे दस्तावेज परराष्ट्र अधिकारी, नोटरी पब्लिक, भारतीय दूतावास, संबंधित बँक अधिकारी यांनी प्रमाणित केलेले पाहिजेत. या अधिकाऱ्यांच्या स्वाक्षर्‍या बँकेच्या अधिकृत शाखेतून पडताळणी करता येतील.


... नाहीतर बँकांना दंड

आरबीआयच्या नियमांनुसार, बँकांनी ग्राहकांसाठी दिलेल्या केवायसीसंदर्भात अमलबजावणी करणं आवश्यक आहे. जर बँकांनी केवायसी नियमांचं पालन केलं नाही तर उल्लंघन करणाऱ्या बँकांना दंड होऊ शकतो.

SBI च्या वेबसाइटवर माहिती

SBIच्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार, केवायसीसाठी द्याव्या लागणाऱ्या कागदपत्रांवर तोच पत्ता असणं अनिवार्य आहे जो बँकेतील खात्यासाठी भरलेल्या फॉर्म असेल. त्यामुळे SBI कडून पाठवण्यात आलेला Alert SMS ग्राहकांना अत्यंत गांभीर्यानं वाचणं गरजेचं आहे.हेही वाचा


संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा