Advertisement

राज्याने केंद्राकडे मागितले ९ लाख N ९० मास्क

कोरोनाशी (coronavirus) मुकाबला करण्यासाठी राज्यात सद्यस्थितीत पुरेशी साधनसामुग्री आहे. पण आपत्कालीन स्थितीतील गरज लक्षात घेता केंद्र सरकारकडून साधनसामुग्री मागण्यात आली आहे.

राज्याने केंद्राकडे मागितले ९ लाख N ९० मास्क
SHARES

कोरोनाशी (coronavirus) मुकाबला करण्यासाठी राज्यात सद्यस्थितीत पुरेशी साधनसामुग्री आहे. पण आपत्कालीन स्थितीतील गरज लक्षात घेता केंद्र सरकारकडून साधनसामुग्री मागण्यात आली आहे. सव्वा ३ लाख पीपीई किट, ९ लाख एन ९० मास्क आणि ९९ लाख ट्रिपल लेयर मास्कची मागणी राज्य सरकारने केंद्राकडे केली आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (health minister rajesh tope) यांनी याबाबत केंद्राला पत्र पाठवलं आहे. 

तुटवडा जाणवू नये

सध्या राज्यातील शासकीय आरोग्य यंत्रणेकडे ३५ हजार पीपीई किटस्, ३ लाखांच्या आसपास एन ९५ मास्क, २० लाख ट्रीपल लेअर मास्क, १३०० व्हेंटिलेटर्स (n 90 mask, ppe kit, triple layer mask) उपलब्ध आहेत. आवश्यक साहित्याची मागणी केंद्र शासनाकडे केली असली तरी राज्यात याचा तुटवडा जाणवू नये यासाठी या साहित्याच्या खरेदीसाठी पर्यायी व्यवस्था करण्याचं काम सुरू करण्यात आलं आहे. या साहित्याची खरेदी करण्याकरीता आवश्यक ती तयारी करण्याबाबत विभागाचे सचिव आणि आयुक्तांना निर्देश देण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

कोरोना व्हायरसच्या प्रतिबंधासाठी राज्यामध्ये पुरेशा प्रमाणात साधनसामग्री उपलब्ध आहे. मात्र, आपत्कालीन स्थिती ओढवल्यास खबरदारीचा उपाय म्हणून केंद्र शासनाकडे सव्वा तीन लाख पीपीई कीटस्, ९ लाख एन ९५ मास्क आणि ९९ लाख ट्रिपल लेअर मास्कची मागणी करण्यात आल्याचं राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं.


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा