Advertisement

26/11 terrorist Attack : २६/११चे हिरो

या पाच शूरवीरांशिवाय हवालदार गजेंद्र सिंग, नागप्पा आर. महाले, किशोर के. शिंदे, संजय गोविलकर, सुनील कुमार यादव आणि इतर अनेकांनीही शौर्याचे उदाहरण सादर केले.

SHARES
01/7
26/11 terrorist Attack : २६/११चे हिरो
मुंबईच्या इतिहासातील सर्वात भीषण दहशतवादी हल्ल्याला १३ वर्षे पूर्ण होत आहेत. पाकिस्तानी दहशतवाद्यांनी ताज आणि ट्रायडंट हॉटेल तसंच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर हल्ला केला होता. देशातील काही धाडसी पोलीस आणि एनएसजी जवानांनी या दहशतवाद्यांचा खंबीरपणे सामना केला आणि अनेकांचे प्राण वाचवले. त्यातील ५ जवानांनी देश आणि देशातील जनतेच्या रक्षणासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली. जाणून घेऊयात या ५ हिरोजबद्दल...
02/7
26/11 terrorist Attack : २६/११चे हिरो
१) हेमंत करकरे मुंबई एटीएसचे प्रमुख हेमंत करकरे रात्री त्यांच्या घरी जेवत होते. तेव्हा त्यांना गुन्हे शाखेच्या कार्यालयातून दहशतवादी हल्ल्याबाबत फोन आला. हेमंत करकरे यांनी तात्काळ घराबाहेर पडून एसीपी अशोक कामटे, इन्स्पेक्टर विजय साळसकर यांच्यासह घटनास्थळी धाव घेतली. यातच कामा रुग्णालयाबाहेर झालेल्या चकमकीत अजमल कसाब आणि इस्माईल खान या दहशतवाद्यांच्या अंदाधुंद गोळीबारामुळे ते शहीद झाले. त्यांना मरणोत्तर अशोक चक्र प्रदान करण्यात आले. मुंबई साखळी बॉम्बस्फोट आणि मालेगाव बॉम्बस्फोटांच्या तपासातही करकरे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती.
03/7
26/11 terrorist Attack : २६/११चे हिरो
२) तुकाराम ओंबळे मुंबई पोलिसांचे एएसआय तुकाराम ओंबळे यांनीच दहशतवादी अजमल कसाबचा कोणत्याही शस्त्राशिवाय सामना केला आणि अखेर त्याला पकडले. यादरम्यान त्याला कसाबच्या बंदुकीतून अनेक गोळ्या लागल्या आणि ते शहीद झाले. शहीद तुकाराम ओंबळे यांना त्यांच्या शौर्याबद्दल अशोक चक्र हा सर्वोच्च शौर्य पुरस्कार प्रदान करण्यात आला.
04/7
26/11 terrorist Attack : २६/११चे हिरो
३) अशोक कामटे अशोक कामटे हे मुंबई पोलिसात एसीपी म्हणून कार्यरत होते. मुंबईवर दहशतवादी हल्ला झाला तेव्हा ते एटीएस प्रमुख हेमंत करकरे यांच्यासोबत होते. कामा हॉस्पिटलबाहेर पाकिस्तानी दहशतवादी इस्माईल खान यानं त्यांच्यावर गोळीबार केला. त्यांच्या डोक्यात गोळी लागली.
05/7
26/11 terrorist Attack : २६/११चे हिरो
४) विजय साळसकर कामा हॉस्पिटलबाहेर झालेल्या गोळीबारात हेमंत करकरे आणि अशोक कामटे यांच्यासह मुंबई अंडरवर्ल्डसाठी एकेकाळी भीतीचे दुसरे नाव असलेले वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय साळसकरही शहीद झाले. शहीद विजय यांना मरणोत्तर अशोक चक्र प्रदान करण्यात आले.
06/7
26/11 terrorist Attack : २६/११चे हिरो
५) मेजर संदीप उन्नीकृष्णन मेजर संदीप उन्नीकृष्णन हे राष्ट्रीय सुरक्षा रक्षक दलाचे (NSG) कमांडो होते. २६/११ च्या चकमकीत ते मिशन ऑपरेशन ब्लॅक टोर्नेडोचे नेतृत्व करत होते आणि ५१ SAG चे कमांडर होते. ताजमहाल पॅलेस आणि टॉवर्स हॉटेलवर ताबा मिळवलेल्या पाकिस्तानी दहशतवाद्यांशी लढत असताना एका दहशतवाद्यानं त्यांच्यावर मागून हल्ला केला आणि ते जागीच ठार झाले. २००९ मध्ये त्यांना मरणोत्तर अशोक चक्र प्रदान करण्यात आले.
07/7
26/11 terrorist Attack : २६/११चे हिरो
या पाच शूरवीरांशिवाय हवालदार गजेंद्र सिंग, नागप्पा आर. महाले, किशोर के. शिंदे, संजय गोविलकर, सुनील कुमार यादव आणि इतर अनेकांनीही शौर्याचे उदाहरण सादर केले.
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा