नगरसेवकाची लादीकरण मोहीम

 Malad West
नगरसेवकाची लादीकरण मोहीम

मालाड - 41 वॉर्डचे नगरसेवक दिपक पवार यांनी गल्लीबोळातील लादीकरण मोहीम हाती घेतलीय. पवार यांनी मालाड परिसरातील सोमवार बाजार, मोठापाडा, जय अंबे चाळ, रेवती सदन, कुंभारवाडा, राजनपाडा, रामनगर, सीता नगरमधील अंतर्गत गल्ल्यांतील लादीकरणाचे काम सुरू केले आहे. पण स्थानिकांनी लादीकरणाचं काम चांगल्या प्रतीचं नसल्याचं म्हटलंय. सर्वत्र लादी तुटलेल्या होत्या. त्यामुळे नवीन लादी लावणं गरजेचं होतं असं दीपक पवार यांच्या कार्यालयातून सांगण्यात आलं.

Loading Comments