Advertisement

कोरोना लस हवी? मग पहिलं हे काम करा, नाहीतर...

कोरोना लस घेण्यासाछी मोबाईल नंबर आधार कार्डला (Aadhar card) लिंक करण्याचे आदेश मोदी सरकानं दिले आहेत.

कोरोना लस हवी? मग पहिलं हे काम करा, नाहीतर...
SHARES

केंद्र सरकारनं सर्व राज्यांना लसीकरण मोहिमेवर लक्ष देण्याचे आदेश दिलेत. त्यासाठी सर्व नागरिकांनी लवकरात लवकर त्यांचा मोबाईल नंबर आधार कार्डला (Aadhar card) लिंक करण्याचे आदेश मोदी सरकानं दिले आहेत.

लसीकरणासाठी 'आधार'चा पुरावा असणं खूप गरजेचं आहे. या माध्यमातून आपण पहिला आणि दुसरा डोस कधी घेतला हे कळू शकेल. हिंदू बिझनेसलाईननं दिलेल्या बातमीनुसार, जर तुम्हाला या दोन्ही लशी घ्यायच्या असतील तर प्रथम तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर आधार कार्डशी लिंक करावा लागेल. तसंच, 'लस कशी, कधी आणि कोणती देण्यात आली ही माहिती डिजिटल रेकॉर्ड करण्यासाठी आधार गरजेचं आहे.

केंद्र सरकारनं राज्यांना हे देखील सांगितलं आहे की, 'लोकांचा मोबाईल नंबर आधार कार्डशी लिंक करा, जेणेकरून लसीकरणासाठी एसएमएस पाठवण्याची सुविधा उपलब्ध होईल.'

लसीकरणाची प्रक्रिया, प्रशासकिय योजना, लसीकरण कर्मचारी आणि लसीकरण करणाऱ्या लोकांसाठी Co-Win अॅप हे व्यासपीठ म्हणून कार्य करेल. या Co-Win अॅपमध्ये ५ विभाग आहेत. पहिले प्रशासकीय विभाग, दुसरे नोंदणी विभाग, तिसरे लसीकरण विभाग, चौथे लाभ मंजूरी विभाग आणि पाचवे अहवाल विभाग. Co-Win वेबसाईटवरुन पाठवलेले प्रमाणपत्र पूर्णपणे क्यूआर कोडनं सुसज्ज आहे.संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा