विजेच्या ट्रान्सफॉर्मरला आग

 Kurla
 विजेच्या ट्रान्सफॉर्मरला आग
 विजेच्या ट्रान्सफॉर्मरला आग
 विजेच्या ट्रान्सफॉर्मरला आग
See all

कुर्ला - पश्चिमेतील विजेच्या ट्रान्सफॉर्मरला शनिवारी दुपारी 12 च्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे अचानक आग लागली. कुर्ला पश्चिमेच्या भाजी मंडईच्या बाजूला हा ट्रान्सफॉर्मर असून, घटनेनंतर रहिवाशांनी तत्काळ ही माहिती अग्निशमन दल आणि पोलिसांना दिली. त्यानंतर अग्निशमन दलाच्या तीन गाड्या तत्काळ घटनास्थळी दाखल झाल्या आणि काही मिनिटांतच ही आग आटोक्यात आणली. सुदैवाने या घटनेत जीवितहानी झालेली नाही. मात्र परिसरातील वीज गेल्याने रहिवाशांना त्रास सहन करावा लागत आहे.

Loading Comments