झाड पडून टॅक्सीचे नुकसान

 wadala
झाड पडून टॅक्सीचे नुकसान

पावसाळा सुरू होण्यापूर्वीच मुंबईतील वृक्षांची पडझड सुरू झाली आहे. एकीकडे मेट्रोसाठी वृक्षांची कत्तल सुरू झाली असतानाच दादरनंतर आता वडाळा स्टेशन रोड येथे टॅक्सीवर झाड कोसळून अपघाताची घटना सोमवारी सकाळी घडली.वडाळा येथे एक टॅक्सीचालक झाडाच्या सावलीत त्याची टॅक्सी (एमएच- 01 जे- 7597) पार्क करत असताना झाडाची एक मोठी फांदी तुटून टॅक्सीवर पडली. यामध्ये टॅक्सीचे नुकसान झाले असून, टॅक्सीचालकाच्या हातालाही खरचटले आहे.

या अपघातात कुठलीही जीवितहानी जरी झाली नसली, तरी पावसाळ्यात झाडे कोसळून होणाऱ्या अशा अपघातांची दखल घेऊन पालिका किती तत्परता दाखवते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Loading Comments