Advertisement

मुंबईकरांच्या पाण्याची चिंता दूर, तलाव भरले तुडुंब


मुंबईकरांच्या पाण्याची चिंता दूर, तलाव भरले तुडुंब
SHARES

गेल्या काही दिवसांपासून सतत पडत असलेल्या मुसळधार पावसाने मुंबईकरांच्या पिण्याच्या पाण्याची चिंता दूर होण्याच्या मार्गावर आहे. कारण मुंबईला पाणीपुरवठा करणारे तुळशी आणि मोडकसागर तलाव ओसंडून वाहू लागले आहेत.

तुळशी आणि मोडकसागरबरोबरच अप्पर वैतरणा, भातसा, विहार, तानसा तसंच मध्य वैतरणा या तलावांतील पाण्याची पातळीही चांगलीच वाढली आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या या सर्व सात तलावांत रविवारी सकाळपर्यंत ६० टक्के पाणीसाठा असल्याची माहिती पालिकेने दिली.

Image result for tulsi dam

तर मुबलक पाणीपुरवठा शक्य

असाच पाऊस पडत राहिला तर लवकरच सर्व तलाव दुथडी भरून वाहतील. यामुळे मुंबईकरांना भविष्यात मुबलक पाणीपुरवठा करणे शक्य होईल, असं पालिकेच्या जल विभागातील अभियंत्यांनी सांगितलं.


जुलैची सरासरी भरून निघाली

यंदा जून महिन्यातच सरासरीइतका पाऊस झाला. तर जुलैच्या पहिल्या आठवड्यातच पावसाने संततधार धरली आणि जुलैची सरासरी पहिल्या 15 दिवसातच भरून निघाली.

मुंबईत सतत पडत असलेल्या पावसामुळे आतापर्यंत आठ लाख दशलक्ष लिटरहून अधिक पाणीसाठ्याची नोंद झाली. सर्व तलाव पूर्ण भरण्यासाठी साडेचौदा लाख दशलक्ष लिटर पाण्याची आवश्यकता असते.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा