Advertisement

अंधेरीत एसआरएच्या इमारतीत आग; दोघांचा मृत्यू


अंधेरीत एसआरएच्या इमारतीत आग; दोघांचा मृत्यू
SHARES

अंधेरी येथील वीरा देसाई रोड परिसरात असलेल्या एसआरएच्या 22 मजली इमारतीमध्ये मंगळवारी रात्री 8.30च्या सुमारास भीषण आग लागली. इमारतीच्या 10 आणि 11 व्या मजल्यावर ही आग लागली. दरम्यान अग्निशमन दलाच्या अथक प्रयत्नानंतर आग विझवण्यात यश आलं. आग लागली त्यावेळी पाच जण इमारतीत अडकले होते. त्यापैकी पैकी 3जणांना सुखरूप वाचवण्यात आलं. मात्र यामधील दोन जणांचा धुरामुळे गुदमरून मृत्यू झाला.


श्वास कोंडल्याने दोघांचा मृत्यू

या इमारतीमधील 10 व्या मजल्यावर इलेक्ट्रीक शॉर्टसर्किट झाल्याने ही आग लागली. या आगीत लाकडी फर्निचर आणि इतर घरातील वस्तु जळू खाक झाल्या. शिवाय आग 11 व्या मजल्यापर्यंत पसरली. दरम्यान 10 मजल्यावरील 1001 या फ्लॅटमध्ये दोघांचे मृतदेह आढळून आले. विकी शर्मा (25), सागर शर्मा (07) असं मृत्य व्यक्तींची नावे आहेत. तर यामध्ये लालकृष्ण शर्मा (50) हे देखील भाजले. दरम्यान त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून सध्या त्यांची प्रकृती ठीक आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा