Advertisement

चेंबूरमध्ये ११ व्या मजल्यावरून पडून कामगारांचा मृत्यू


चेंबूरमध्ये ११ व्या मजल्यावरून पडून कामगारांचा मृत्यू
SHARES

चेंबूरमध्ये बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या ११ व्या मजल्यावरून पडून २ मजुरांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये दोन मजूर जखमी झाले आहेत. शुक्रवारी दुपारच्या सुमारास ही घटना घडली आहे. यामध्ये अहमद शहादत शेख (३२) आणि राजेंद्र बट्टीलाल कोल (४५) यांचा मृत्यू झाला असून पोलिस या घटनेचा तपास करत आहेत.


आणि ४ मजूर कोसळले

चेंबूरमधील आर. के. स्टुडिओसमोर शबरी एंटरप्रायझेस या कमर्शिअल इमारतीच्या ११ व्या मजल्यावर खिडकीच्या दुरुस्तीचं काम सुरू असताना ४ मजूर खाली पडले. यामधील २ कामगारांचा जागीच मृत्यू झाला. तर दोन कामगार गंभीर जखमी झाले आहेत. या कामगारांना महापालिकेच्या शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा