Advertisement

Budget 2022 : 'या' अॅपच्या माध्यमातून जाणून घ्या, केंद्रीय अर्थसंकल्पाचे प्रत्येक अपडेट

१ फेब्रुवारी २०२२ रोजी केंद्रीय अर्थसंकल्प २०२२ होणार आहे. यावेळीही ते पेपरलेस असेल आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन या यंदाचा अर्थसंकल्प संसद भवनात मांडतील.

Budget 2022 : 'या' अॅपच्या माध्यमातून जाणून घ्या, केंद्रीय अर्थसंकल्पाचे प्रत्येक अपडेट
SHARES

१ फेब्रुवारी २०२२ रोजी केंद्रीय अर्थसंकल्प २०२२ होणार आहे. यावेळीही ते पेपरलेस असेल आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन या यंदाचा अर्थसंकल्प संसद भवनात मांडतील. केंद्रीय अर्थसंकल्पाशी संबंधित प्रत्येक छोटी-मोठी माहिती तुम्ही मोबाईल अ‍ॅपवर मिळवू शकता. ‘Union Budget Mobile App’ असं या अ‍ॅपचं नाव आहे. हे गुगल प्ले स्टोअर आणि अ‍ॅपल अ‍ॅप स्टोअर वरून सहजपणे डाउनलोड केलं जाऊ शकतं. पण ते Android 5.0 किंवा त्यावरील वर्जनसाठी आहे, तर iOS 10 किंवा पुढच्या वर्जनला सपोर्ट करतं.

संपूर्ण भाषण आणि त्यातील ठळक मुद्दे बजेटच्या एकामागून एक अपडेट्ससह अ‍ॅपवर उपलब्ध असतील. याशिवाय, तुम्ही त्याची PDF कॉपी देखील डाउनलोड करू शकता. वास्तविक, हे ऍप्लिकेशन संसद सदस्य आणि सामान्य लोकांसाठी बजेट दस्तऐवज सहज उपलब्ध व्हावे यासाठी आणले होते.

या मोबाइल अ‍ॅपच्या मदतीने, केंद्रीय अर्थसंकल्पाशी संबंधित १४ कागदपत्रे पाहता येतील. मोबाईल अ‍ॅप द्विभाषिक असून, अर्थसंकल्पाची माहिती हिंदी आणि इंग्रजीमध्ये मिळू शकणार आहे. याशिवाय, तुम्ही यामधून PDF दस्तऐवज डाउनलोड, प्रिंट, शोध आणि झूम इन आणि झूम आउट करू शकाल.

शिवाय, हे अ‍ॅप डेटा गोळा करण्यासाठी सुरक्षित आणि ऑडिटेड API वापरते. तुम्ही हे अ‍ॅप indiabudget.gov.in वरून देखील डाउनलोड करू शकता.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा