खोदा पहाड निकाला चुहा

 Pali Hill
खोदा पहाड निकाला चुहा

मुंबई - उरणमध्ये संशयितांच्या दिसण्याने संपूर्ण देशात एकच खळबळ उडाली होती. उरणसह मुंबई आणि आसपासच्या महत्वाच्या ठिकाणांची सुरक्षा वाढवण्यात आली होती. गेल्या दीड दिवसापासून नेव्ही, फोर्स वन, एनएसजी, आयबी, एटीस तसेच स्थानिक पोलिसांनी उरणचा परिसर पिंजून काढला होता, मात्र तब्बल दोन दिवसांनतरही सुरक्षा यंत्रणांच्या हाती ठोस असे काहीच लागलेले नाही. दरम्यान नेव्हीने आपले सर्च ऑपरेशन देखील थांबवले आहे. महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकांनी गृह खात्याला रिपोर्ट सादर केला असून त्या रिपोर्टमध्ये नेमके काय आहे, हे सांगण्यास मात्र पोलीस तयार नाही. याआधी देखील असे दहशतवादी घुसल्याच्या अफवा पसरल्या आहेत, मात्र एवढा गाजावाजा कधीच झाला नव्हता. उरणला एवढं गंभीरतेने घेण्यामागे काही कारण आहे, देशातील सर्वात मोठं बंदर जवाहरलाल नेहरु पोर्ट ट्रस्ट (JNPT) उरणमध्ये आहे. नौदलाचा तळही उरणच्या जवळ मोरा येथे आहे. ONGC प्लांटही उरणमध्ये असून, GTPS-MSEB चा आशियातील पहिला नैसर्गिक गॅस प्रकल्प उरणमध्येच असल्याने सुरक्षा यंत्रणाचे ढाबे दणाणले होत.

Loading Comments