Advertisement

मुंबईत मंगळवारी केवळ ५८ केंद्रांवर लसीकरण

मंगळवारी ३०९ पैकी ५८ निवडक महापालिका आणि शासकीय केंद्रांवर लस मिळणार असल्याचं प्रशासनानं स्पष्ट केलं आहे.

मुंबईत मंगळवारी केवळ ५८ केंद्रांवर लसीकरण
SHARES

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी लसीकरण हा जालीम उपाय मानला जात आहे. त्यामुळं संपुर्ण देशभरात लसीकरण केलं जात आहे. परंतू, सध्या लसीकरण महत्वाचं असलं तरी अद्याप अनेक ठिकाणी लसींच्या अपुऱ्या साठ्यामुळं काही लसीकरण केंद्रावर लसीकरण होत नाही. शिवाय, सध्या महापालिकेकडं उपलब्ध लसींचा साठा कमी असल्याने मंगळवारी ३०९ पैकी ५८ निवडक महापालिका आणि शासकीय केंद्रांवर लस मिळणार असल्याचं प्रशासनानं स्पष्ट केलं आहे.

मुंबईत १६ जानेवारीपासून लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली आहे. आतापर्यंत ६५ लाख २४ हजार ८४१ नागरिकांनी लस घेतली आहे. यापैकी ५० लाख २८ हजार लोकांनी कोविड प्रतिबंध लसीचा पहिला डोस आणि १४ लाख ९६ हजार नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे.

दररोज १ लाख लोकांना लस देण्याचं लक्ष्य पालिका प्रशासनानं ठेवलं आहे. महापालिका, सरकारी आणि खासगी केंद्रांमध्ये मंगळवारी ७६ हजार नागरिकांनी लस घेतली. मात्र केंद्राकडून लसीचा नवीन साठा आलेला नाही. त्याचा परिणाम मंगळवारी होणाऱ्या लसीकरण मोहिमेवर होणार आहे.

परंतु, लवकरच केंद्रांतून लसींचा साठा येण्याची शक्यता असल्याने बुधवारपासून लसीकरण मोहीम सुरळीत होईल, असा विश्वास पालिका प्रशासनाने व्यक्त केला आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा