Advertisement

वंदे भारत एक्स्प्रेसचा सलग दुसऱ्या दिवशी अपघात

काल गुजरातच्या वातवा स्टेशनवरुन मणिनगरच्या दिशेने येत असताना वंदे भारत एक्सप्रेस म्हशींच्या कळपाला धडकली होती.

वंदे भारत एक्स्प्रेसचा सलग दुसऱ्या दिवशी अपघात
SHARES

वंदे भारत एक्सप्रेस (Vande Bharat Express) चा आज सलग दुसऱ्या दिवशी अपघात झाला आहे. गांधीनगर ते मुंबई दरम्यान ही वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन (Vande Bharat Express) धावते.

गांधीनगर-मुंबई मार्गावरील वंदे भारत एक्स्प्रेसने गुजरातमधील आनंद स्थानकाजवळ एका गायीला धडक दिल्याची माहिती मिळतेय.

मुंबईहून जाणाऱ्या रेल्वेला शुक्रवारी कंझरी आणि आनंद स्थानकांदरम्यान जनावरांनी धडक दिली.

यामुळे ट्रेनच्या पुढच्या बंपरमध्ये फक्त एक छोटासा डेंट आला आहे, असे अधिकाऱ्यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेला सांगितले.

गांधीनगर-मुंबई मार्गावरील वंदे भारत एक्स्प्रेसने गुजरातमधील आनंद स्थानकाजवळ गुरुवारी म्हशींच्या कळपाला धडक दिली होती. त्यामुळे ट्रेनच्या पुढच्या भागाचे नुकसान झाले होते. यात चार म्हशींचा मृत्यू झाला होता. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 30 सप्टेंबर रोजी गुजरात दौऱ्यात गांधीनगर ते मुंबई दरम्यानच्या हायस्पीड वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला होता. पंतप्रधानांनी वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनच्या डब्यांची पाहणी केली आणि उपलब्ध सुविधांचाही आढावा घेतला. ट्रेनच्या लोकोमोटिव्ह इंजिनच्या कंट्रोल सेंटरचीही त्यांनी पाहणी केली. वंदे भारत ट्रेन यशस्वी करण्यासाठी कष्ट करणाऱ्या कामगार, अभियंते आणि इतर कर्मचाऱ्यांशीही पंतप्रधान मोदींनी संवाद साधला.

वंदे भारतची आसन रचना

वंदे भारत ट्रेनमध्ये 1,123 जागा आहेत. यात एक्झिक्युटिव्ह चेअर कारमध्ये 104 जागा आणि चेअर कारमध्ये 1,019 जागा आहेत. एक्झिक्युटिव्ह चेअर कारमधील सर्व 104 आणि चेअर कारमधील 982 जागा बुक करण्यात आल्या होत्या. ही तिसरी वंदे भारत एक्सप्रेस असून या वर्गाची पहिली ट्रेन नवी दिल्ली-वाराणसी मार्गावर सुरू करण्यात आली. तर दुसरी नवी दिल्ली-श्री माता वैष्णोदेवी कटसंबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा