पालिकेच्या निषेधार्थ रॅली

 Ghatkopar
पालिकेच्या निषेधार्थ रॅली
पालिकेच्या निषेधार्थ रॅली
पालिकेच्या निषेधार्थ रॅली
पालिकेच्या निषेधार्थ रॅली
पालिकेच्या निषेधार्थ रॅली
See all

घाटकोपर - रविवारी भारतीय मानवतावादी पार्टीच्या वतीने जनजागृती रॅलीचे आयोजन केले होते. ही रॅली नित्यानंद हॉटेल ते नीलयोग्य मॉल अशी आयोजित करण्यात आली होती. भारतीय मानवतावादी पार्टी अध्यक्ष आनंदा होवाळ यांच्या मार्गदर्शखाली रॅली काढण्यात आली होती. "येत्या पालिका निवडणुकीला भारतीय मानवतावादी पार्टी २२ वॉर्डमधून निवडणूक लढणार आहे," असे संकेत आनंदा होवाळ यांनी दिलेत. पालिका शाळा, दवाखाने, रूग्णालयांचा दर्जा सुधारणे, पालिकेतील रिक्त जागा भरणे या मागण्यांसाठी रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.

Loading Comments