पालिका कार्यालयातलीच स्वच्छतागृह अस्वच्छ!

 Fort
पालिका कार्यालयातलीच स्वच्छतागृह अस्वच्छ!
Fort, Mumbai  -  

एकीकडे मुंबई महापालिका स्वच्छ मुंबई, सुंदर मुंबईचा नारा देते, मात्र महापालिकेच्या ए विभाग कार्यालयात मात्र उलटं चित्र आहे. ए विभाग कार्यालयाच्या पहिल्या मजल्यावर एका बाजूला महिलांसाठी तर त्याच्या दुसऱ्या बाजूला पुरुषांसाठी स्वच्छतागृह आहे. मात्र पुरुषांसाठी असलेल्या स्वच्छतागृहातून मोठ्या प्रमाणात येत असलेल्या दुर्गंधीचा सामना कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना सहन करावा लागत आहे.

काही महिन्यांपूर्वीच मुंबई महापालिकेचे आयुक्त अजोय मेहता यांनी सार्वजनिक स्वच्छतागृहांची पाहणी केली होती. त्यावेळी त्यांनी अस्वच्छ स्वच्छतागृहांना नोटीस बजावली होती. तशीच पाहणी महापालिका विभागातील स्वच्छतागृहांची करून अस्वच्छ स्वच्छतागृह असलेल्या वॉर्डच्या सहआयुक्तांना नोटीस बजावावी अशी प्रतिक्रिया नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

याबाबत ए महापालिका विभागाचे सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर यांना यासंदर्भात विचारणा करण्यास गेले असता ते रजेवर असल्याचे सांगण्यात आले. तसेच प्रभारी आयुक्त देखील उपस्थित नसल्याचे सांगण्यात आले.

Loading Comments