Advertisement

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांतील जलसाठा ९० टक्क्यांवर


मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांतील जलसाठा ९० टक्क्यांवर
SHARES

मुंबई व आसपासच्या परिसरात मागील काही दिवसात पडलेल्या मुसळधार पावसामुळं मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांतील पाणीसाठ्यात थोडी वाढ झाली आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या ७ही तलावात आता ९० टक्क्यांहून अधिक पाणीसाठा जमा झाला आहे, तरीही गेल्या २ वर्षांच्या तुलनेत हा पाणीसाठा कमी असून तलाव पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी अद्याप १० टक्के तूट आहे.

जुलै महिन्यात मुसळधार पाऊस कोसळल्यामुळे तलावांतील पाणीसाठ्यात चांगली वाढ झाली. मात्र नंतर ऑगस्टमध्ये पावसानं ओढ दिल्यामुळं धरणातील पाण्याचा साठा वाढण्याची गती कमी झाली. महिन्याभरापासून तलाव क्षेत्रातही अगदी मोजकाच पाऊस पडत होता. मात्र सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच मुंबई, पालघर, नाशिक परिसरात चांगला पाऊस पडल्यामुळे धरणातील पाणीसाठा वाढण्याची आशा निर्माण झाली आहे.

सप्टेंबरच्या अखेरीस सातही तलावांतील पाणीसाठा १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटरवर पोहोचला तरच मुंबईकरांना पूर्ण क्षमतेनं पाणीपुरवठा करणे शक्य होते. १ ऑक्टोबरला तलावांतील पाणीसाठ्याचा आढावा घेऊन तलावातील उपलब्ध पाणीसाठा ३१ जुलैपर्यंत पुरेल यादृष्टीने पालिकेच्या जल अभियंता खात्याद्वारे नियोजन केले जाते.

सध्या असलेला पाणीसाठा हा गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत कमी आहे. शुक्रवापर्यंत सातही तलावात मिळून १३ लाख १४ हजार ११३ दशलक्ष लिटर म्हणजेच ९०.७९  टक्के  पाणीसाठा जमा झाला.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा