Advertisement

कुर्ला, घाटकोपरवासियांनो १४ मेपर्यंत पाणी उकळूनच प्या!


कुर्ला, घाटकोपरवासियांनो १४ मेपर्यंत पाणी उकळूनच प्या!
SHARES

घाटकोपर उच्चस्तरीय जलाशयाच्या पाण्याची टाकी क्र. २ च्या दुरुस्तीचं काम पूर्ण झालं आहे. हे जलाशय दिनांक ०७ मे २०१८ पासून सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे ०७ मे २०१८ पासून पुढील सात दिवस अर्थातच १४ मे २०१८ पर्यंत कुर्ला आणि घाटकोपरमधील नागरिकांना गढुळ पाण्याचा पुरवठा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून या परिसरातील नागरिकांनी गढुळ पाणी उकळून आणि गाळून पिण्याचं आवाहन मुंबई महापालिकेने केलं आहे.


या भागातील नागरिकांनो घ्या काळजी

कुर्ला ‘एल’ विभागातील बाधित प्रभाग क्र. १५७ ते १६१ आणि १६४ मधील संघर्षनगर, खैराणी रोड दोन्ही साईड, सरदार कपाऊंड डिसुझा कंपाऊड, ऐयप्पी मंदिर मार्ग, लक्ष्मी नारायण मंदिर मार्ग, यादवनगर, राजीवनगर, अहमद रजा मार्ग, भानुशालीवाडी, कुलकर्णीवाडी, लोयल्काव कंपाऊंड, सुभाषनगर, बारदान गल्ली, इंदिरानगर, मोहिली पाईपलाईन, परेरावाडी, गणेशनगर, नारायणनगर, नारी सेवा सदन मार्ग, भीमनगर, आंबेडकरनगर/ सानेगुरुजीनगर, सुंदरबाग, वाल्मिल‍कीनगर, अशोकनगर, हिमालया सोसायटी, संजयनगर, समतानगर, गैबंशा स्कूल, नुराणी मस्जिद, गरीबी हटावनगर, मुकुंद कंपाऊंड.


येथील नागरिकांनी घ्यावी विशेष काळजी

घाटकोपर ‘एन’ विभागातील बाधित प्रभाग क्र. १२३ ते १२७ आणि १३० मधील आनंदगड, शंकर मंदिर, रामनगर, हनुमान मंदिर, राहुलनगर, कैलासनगर, संजय गांधीनगर, वर्षानगर, जय मल्हानरनगर, खंडोबा टेकडी, शिवाजीनगर, आंबेडकरनगर, निरंकारी सोसायटी, वर्षानगर टॅंक, डी आणि सी मनपा वसाहत, रायगड विभाजी, गांवदेवी, पठाण चाळ, अमृतनगर, इंदिरानगर २, अमिनाबाई चाळ, काठोडी पाडा, भिमनगर, इंदिरानगर १, अल्तांफनगर, गेलदानगर, जब्‍लुशानगर, गोलीबार रोड, सेवानगर, ओएनजीसी कॉलनी, माझगांव डाक कॉलनी, गंगावाडी गेटनगर २, विक्रोळी पार्क साईटचा अंशतः भाग (म्हणजे आनंदगड उदंच्चमन केंद्राद्वारे होणारा पुरवठा) सिद्धार्थनगर, साईनाथनगर आणि रोहिदास रोड.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा