Advertisement

शुक्रवार- शनिवारी 'या' भागातील पाणीपुरवठ्यावर होणार परिणाम

पालिकेद्वारे ट्विट करत यासंदर्भात माहिती देण्यात आली. जाणून घ्या कुठले वॉर्ड आहेत ते...

शुक्रवार- शनिवारी 'या' भागातील पाणीपुरवठ्यावर होणार परिणाम
SHARES

बृहन्मुंबई महानगरपालिकेनं (BMC) मंगळवार, १८ जानेवारी रोजी ट्विटरवर सांगितलं की, A, B, E, F/दक्षिण आणि F/उत्तर प्रभागातील काही भागांचा पाणीपुरवठा खंडित होणार आहे. शुक्रवारी सकाळी १० वाजल्यापासून पाणीपुरवठा खंडित केला जाईल.

शुक्रवार,२१ जानेवारी २०२२ रोजी सकाळी १० ते शनिवार, २२ जानेवारी २०२२ रोजी सकाळी १० वाजेपर्यंत ए, बी, ई, एफ/दक्षिण व एफ/उत्तर विभागातील काही परिसरांमध्ये पाणीपुरवठा बंद असेल.

तर एफ/दक्षिण आणि एफ/उत्तर विभागात इतर काही भागांमध्ये कमी दाबानं पाणीपुरवठा करण्यात येईल. पालिकेद्वारे ट्विट करत यासंदर्भात माहिती देण्यात आली.

(सविस्तर वृत्त लवकरच)



हेही वाचा

राणीच्या बागेत प्राण्याचं बारसं; एकाच 'ऑस्कर' नाव तर दुसऱ्याच 'वीरा'

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा