मातीचा ढिगारा उचलण्याचा पालिकेला विसर

 Malad
मातीचा ढिगारा उचलण्याचा पालिकेला विसर
मातीचा ढिगारा उचलण्याचा पालिकेला विसर
See all

मालाड – पी उत्तर पालिका विभागानं मालाड पश्चिमेकडील नहारनगरच्या मित्तल कॉलेजवळील रस्त्याच्या दुरुस्तीचं काम केलं. दुरुस्तीचं काम महिनाभरापूर्वी पालिकेने केल्याची माहिती स्थानिक दुकानदारांनी दिली. मात्र या मातीचा ढीग उचलण्यास पालिकेला विसर पडला आहे. वाऱ्यामुळे माती इतरत्र पसरत असल्याने याचा नाहक त्रास होत असल्याचं दुकानदारांनी सांगितलं.

काम केलेल्या कंत्राटदारांकडून माती उचलली नसेल, तर कर्मचाऱ्यांना सांगून माती उचलण्यात येईल, असं पी उत्तर पालिका विभागाचे घनकचरा विभागाचे सहायक अभियंता प्रकाश गायकर यांनी सांगितलं.

Loading Comments