जागतिक ग्राहक दिन : ग्राहकांनो, खरेदी करताना 'अशी' घ्या काळजी

ग्राहक संरक्षण कायदा १९८६ नुसार ग्राहकांना वस्तू निवडणे, त्याची गुणवत्ता आणि दर्जा याचं प्रमाण जाणून घेण्याचा अधिकार आहे. आणि ग्राहकांची फसवणूक रोखण्यासाठी जिल्हा ग्राहक मंच, ग्राहक न्यायालय आणि जिल्हा तक्रार निवारण ही प्रणाली राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर कार्यरत आहे.

  • जागतिक ग्राहक दिन : ग्राहकांनो, खरेदी करताना 'अशी' घ्या काळजी
SHARE

ग्राहक म्हणजे बाजारपेठेचा राजा. आजच्या जागतिकीकरण स्पर्धात्मक युगात हा ग्राहक राजा अतिशय महत्वाचा भाग झाला आहे. ग्राहक हा बाजारपेठेतील आर्थिक उलाढाल आणि खरेदी विक्रीचा केंद्रबिंदू आहे. पण अनेकदा एक वस्तू खरेदी करा आणि दुसरी मोफत मिळवा, अमुक खरेदीवर सोने चांदीचे नाणे मोफत मिळेल, चेहरा ओळखा आणि लाखांची बक्षिसे जिंका, भाग्यवान विजेत्यांना कार मिळेल, अशा जाहिराती दाखवून ग्राहकांची फसवणूक केली जाते. त्यामुळे ग्राहकांनो, वस्तू खरेदी करताना कुठल्याही आमिषाला बळी न पडता ही तिच वस्तू असल्याचं नीट पारखून घ्या. 


 

'इथं' तक्रार करा

ग्राहक संरक्षण कायदा १९८६ नुसार ग्राहकांना वस्तू निवडणे, त्याची गुणवत्ता आणि दर्जा याचं प्रमाण जाणून घेण्याचा अधिकार आहे. आणि ग्राहकांची फसवणूक रोखण्यासाठी जिल्हा ग्राहक मंच, ग्राहक न्यायालय आणि जिल्हा तक्रार निवारण ही प्रणाली राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर कार्यरत आहे.  


ऑनलाईन वस्तूंची खरेदी करताना ग्राहकांनी सावधानता बाळगायला हवी. फसवणूक झाल्यास ग्राहकांनी ग्राहक न्यायालय किंवा जिल्हा ग्राहक मंचाकडे तक्रार करावी. आता रेरा कायदाही अमलात आला आहे. आणि जागतिकीकरण स्पर्धात्मक युगात ग्राहकांसाठी हा दिन साजरा होणे गरजेचं आहे. 
- वर्षा राऊत, अभियान प्रमुख, मुंबई ग्राहक पंचायत  


म्हणून साजरा होतो ग्राहक दिन 

ग्राहकांना सेवा पुरवताना होणाऱ्या हलगर्जीपणामुळे १९६० मध्ये अमेरिकेत अध्यक्षीय निवडणुकीमध्ये ग्राहक चळवळीचा मुद्दा उपस्थित झाला होता. त्यामुळे अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष जॉन. एफ. केनेडी यांनी ग्राहकांच्या प्रश्नांचे निवारण करण्यासाठी एक व्यासपीठ तयार केलं आणि याबाबत जागतिक स्तरावर पाठपुरावाही करण्यात आला. त्याला युनेस्कोकडूनही मान्यता मिळाली. त्यानुसार दरवर्षी १५ मार्च हा दिवस जागतिक ग्राहक दिन म्हणून पाळला जातो.

वस्तू खरेदी करताना 'ही' काळजी घ्या

  • फसव्या जाहिरातींना बळी पडू नका
  • वस्तू खरेदी करताना एम.आर.पी पेक्षा जास्त रक्कम देऊ नका
  • वस्तूंची खरेदी करताना बिल मागणे हा ग्राहकांचा अधिकार आहे
  • सोने खरेदी करताना हाॅलमार्ककडे लक्ष द्या
  • डबाबंद खाद्य पदार्थांची व्यवस्थित पाहणी करा
  • वस्तू खरेदी करताना एक्सपायरी डेट तपासा
  • पेट्रोल पंपावर पेट्रोल भरताना शून्य तपासा आणि त्यानंतरच पेट्रोल भरा
  • ऑनलाइन खरेदी करताना सजग राहा
  • वस्तू खरेदी करताना त्याची पूर्ण माहिती जाणून घ्या

ग्राहकांना संरक्षणाचा, माहिती मिळवण्याचा, निवड करण्याण्याचा अधिकार ग्राहकांना आहे. अनेकदा खरेदी करतांना किंवा सर्विसेसचा वापर करतांना ग्राहक बऱ्याच गोष्टींकडे दुर्लक्ष करतात आणि याचाच फायदा विक्रेते घेतात. त्यामुळे 'जागो ग्राहक जागो'.


संबंधित विषय
ताज्या बातम्या