Advertisement

केंद्रीय पथकाकडून वरळी कोळीवाड्याच्या कोरानामुक्तीचं कौतुक


केंद्रीय पथकाकडून वरळी कोळीवाड्याच्या कोरानामुक्तीचं कौतुक
SHARES

वरळी कोळीवाडा हे देशातील कोरोनामुक्तीचे एक उत्तम उदाहरण होऊ शकते असे सांगून केंद्रीय सचिव जोशी यांनी महाराष्ट्राच्या कोरोना बाधितांचा कालावधी दुप्पट होण्याच्या दिवसांमध्ये वाढ झाल्याचे सांगितले. महाराष्ट्रातील काही चांगल्या गोष्टींचा आवर्जुन उल्लेख करावा लागेल. महाराष्ट्राचा डबलिंक रेट ६.३ आहे तर  मुंबईचा ४.३.  वरळी कोळीवाड्याप्रमाणे इतर कंटेंनमेंट झोनमध्ये काम झाल्यास विषाणुची साखळी तोडण्यास मदत होईल असं त्यांनी म्हटलं.

केंद्रीय पथकानं वरळीकोळीवाड्याला भेट दिली. त्यावेळी केलेल्या पहाणीनुसार त्यांनी मुख्यमंत्र्यासमोर निकर्ष मांडले. यामध्ये प्रामुख्याने डोअर टु डोअर सर्व्हेवर भर दिला जावा, हे काम करणाऱ्या स्वंयसेवकांची संख्या वाढविण्यात यावी, सध्या राज्यातील दवाखान्यांमध्ये पुरेशा आरोग्य सुविधा उपलब्ध आहेत पण भविष्यातील गरज लक्षात घेऊन महापालिकेच्या व इतर कोरोना हॉस्पीटलमध्ये सुविधा वाढवल्या जाव्यात, कंटेनमेंट क्षेत्रात लॉकडाऊनचे कडक पालन व्हावे, हायरिस्क पेशंटवर लक्ष केंद्रीत करावे, झोपडपट्टी भागात प्रादुर्भाव वाढू देऊ नये, संशयित केसेसचे शिफ्टींग करण्याचा विचार व्हावा, स्थलांतरीत ज्यांच्याकडे रेशनकार्ड नाही त्यांच्या अन्नधान्याच्या वितरणाची पॉलीसी तयार करावी असंही त्यांनी म्हटलं.

मुंबई महापालिकेच्या जी दक्षिण विभागातील वरळी परिसरात कोरोनाग्रस्तांची संख्या जास्त आहे. यामधील एकट्या वरळी कोडीवाड्यात सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली होती. परंतु, काही दिवसांपूर्वी वरळीतील १२९ जणांना घरी सोडण्यात आलं. त्यामुळं तेथील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला. 

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा