Advertisement

एमअायजीच्या विजयात अादित्य चव्हाण चमकला


एमअायजीच्या विजयात अादित्य चव्हाण चमकला
SHARES

दिलीप वेंगसरकर फाऊंडेशनतर्फे चर्चगेट येथील अोव्हल मैदानावर झालेल्या १२ वर्षांखालील मुलांच्या टोटल वेंगसरकर क्रिकेट स्पर्धेत अादित्य चव्हाणच्या दमदार गोलंदाजीच्या जोरावर एमअायजी संघाने अखिलेश स्पोर्टस क्लबचा १२२ धावांनी धुव्वा उडवला. अादित्य चव्हाण याने अवघ्या ४ धावांत ४ विकेट्स मिळवत एमअायजीच्या यशात मोलाचा वाटा उचलला. जी. मानव (४४), विहान मेहता (नाबाद ४३) अाणि प्रणव तक्तीयानी (३३) यांच्या अप्रतिम फलंदाजीमुळे एमअायजी क्लबने २५ षटकांत ५ बाद २०७ धावा उभारल्या. मात्र हे अाव्हान पार करताना अखिलेश संघाचा डाव अवघ्या ८६ धावांवर गारद झाला.


साईनाथ स्पोर्टस क्लबचाही विजय

याच मैदानावर झालेल्या अन्य लढतींमध्ये, साईनाथ स्पोर्टस क्लबने वेंगसरकर अकादमी माहूल संघावर ६ विकेट्स राखून विजय मिळवला. वेंगसरकर अकादमीला १२२ धावांपर्यंतच मजल मारता अाली. तुषार सिंग (३१) अाणि देवेश महाडिक (३९) यांनी संघासाठी योगदान दिले. क्रिश कानवदेचे दमदार अर्धशतक (५८) अाणि त्याला मिळालेली कृष्णा पाटीलची (नाबाद २४) साथ यामुळे साईनाथ संघाने चार विकेट्सच्या मोबदल्यात हे अाव्हान सहज पार केले. क्रिश कानवदे सामनावीर ठरला.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा