Advertisement

२५ वर्षांनंतर ठाण्यातील स्टेडियम क्रिकेट सामन्यांसाठी सज्ज

तब्बल 25 वर्षांनंतर ठाण्यातील दादोजी कोंडदेव स्टेडियमवर क्रिकेट सामन्याचे आयोजन करण्यात आले आहे.

२५ वर्षांनंतर ठाण्यातील स्टेडियम क्रिकेट सामन्यांसाठी सज्ज
Dadoji Kondadev Stadium in Thane
SHARES

तब्बल २५ वर्षांनंतर ठाण्यातील दादोजी कोंडदेव स्टेडियमवर क्रिकेट सामन्याचे आयोजन करण्यात आले आहे. या स्टेडियममध्ये ९०च्या दशकात रणजी ट्रॉफीचे सामने आयोजित केले जायचे.

यावर्षी, डिसेंबरमध्ये विजय हजारे ट्रॉफीचे काही खेळ आयोजित केले जातील. या स्टेडियममध्ये जवळपास २५ वर्षांच्या कालावधीनंतर देशांतर्गत खेळाचे आयोजन केले जाईल.

संपूर्णपणे नूतनीकरण केल्यानंतर, मुंबई क्रिकेट असोसिएशननं (MCA) गेल्या वर्षी मुंबई आणि बंगाल यांच्यात २३ वर्षांखालील CK नायडू ट्रॉफीचा ४ दिवसांचा सामना आयोजित केला होता. त्यानंतर गेल्या काही वर्षांत महिला वन-डे चॅम्पियनशिपचे १२ सामने झाले.

एमसीएनं ठाणे स्टेडियमच्या नूतनीकरणाचे श्रेय महाराष्ट्राचे मंत्री एकनाथ शिंदे आणि ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के यांना दिले आहे.हेही वाचा

'हिट-मॅन' रोहित शर्माची एकदिवसीय संघाच्या कर्णधार पदी निवड

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा