Advertisement

'हिट-मॅन' रोहित शर्माची एकदिवसीय संघाच्या कर्णधार पदी निवड

भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं (बीसीसीआय) रोहित शर्माच्या कर्णधारपदाच्या नियुक्तीची ट्वीट करत माहिती दिली आहे.

'हिट-मॅन' रोहित शर्माची एकदिवसीय संघाच्या कर्णधार पदी निवड
SHARES

भारतीय क्रिकेट संघाचा सलामीवीर 'हिट-मॅन' रोहित शर्मा याची एकदिवसीय संघाच्या कर्णधार पदी निवड करण्यात आली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं (बीसीसीआय) रोहित शर्माच्या कर्णधारपदाच्या नियुक्तीची ट्वीट करत माहिती दिली आहे. विशेष म्हणजे भारताच्या आगामी साऊथ आफ्रिका दौऱ्यातही रोहित शर्माची उपकर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

बीसीसीआयनं साऊथ आफ्रिका दौऱ्यासाठी भारतीय संघाची निवड केली आहे. या दौऱ्यातील ३ एकदिवसीय सामन्याकरीता रोहित शर्मा कर्णधार पदाची धुरा साभाळणार आहे. त्यामुळं आता भारतीय संघ रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली कसं खेळतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

भारताचा कर्णधार विराट कोहली यानं टी-२० विश्वचषक २०२१नंतर टी २० संघाचं कर्णधार पद सोडण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर रोहित शर्मा याची निवड करण्यात आली.

भारतीय संघ :

विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), केएल राहुल, मयंक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, श्रेयस अय्यर, हनुमा विहारी, ऋषभ पंत (डब्ल्यूके), रिद्धिमान साहा (डब्ल्यूके), आर अश्विन, जयंत यादव, इशांत शर्मा , मोहम्मद शमी, उमेश यादव, जसप्रीत बुमराह, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज खेळाडू: नवदीप सैनी, सौरभ कुमार, दीपक चहर, अर्जन नागवासवाला.

दक्षिण अफ्रिका संघ

डीन एल्गर (कर्णधार), टेम्बा बावुमा (उपकर्णधार), क्विंटन डी कॉक (डब्ल्यूके), कागिसो रबाडा, सारेल एरवी, ब्यूरन हेंड्रिक्स, जॉर्ज लिंडे, केशव महाराज. लुंगी एनगिडी, एडन मार्कराम, व्यान मुल्डर, एनरिक नॉर्टजे, कीगन पीटरसन, रॅसी व्हॅन डर ड्युसेन. काइल व्हर्न, मार्को जेन्सन, ग्लेंटन स्टर्मन. प्रेनेलन सुब्रायन, सिसांडा मगला, रायन रिकेल्टन, डुआन ऑलिव्हियर.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा