Advertisement

चौथ्या कसोटीसाठी भारतीय संघ जाहीर, 'हा' खेळाडू करणार पदार्पण

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा कसोटी सामना गुरूवारपासून सिडनी इथं सुरु होणार आहे.

चौथ्या कसोटीसाठी भारतीय संघ जाहीर, 'हा' खेळाडू करणार पदार्पण
SHARES

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा कसोटी सामना गुरूवारपासून सिडनी इथं सुरु होणार आहे. या सामन्यासाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. नवदीप सैनी या सामन्यातून कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करत आहे, बीसीसीआयनं याबाबत माहिती दिली. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चार सामन्यांच्या मालिकेत दोन्ही संघ १-१ असं बरोबरीत आहेत.

भारताला मेलबर्न क्रिकेट मैदानावरील कामगिरी कायम ठेवावी लागणार आहे. दुसर्‍या कसोटीतील पराभवाला मागे सारुन तिसरी कसोटी कशी जिंकता येईल असा ऑस्ट्रेलियाला संघाचा प्रयत्न असणार आहे. तिसर्‍या कसोटीसाठी संघ निवडणं ही दोन्ही संघांची सर्वात मोठी चिंतेची बाब असणार आहे.

बॉर्डर-गावस्कर मालिकेतील तिसरा कसोटी सामना सिडनीमध्ये ७ जानेवारीपासून सुरु होणार आहे. तर चौथा आणि अखेरचा सामना ब्रिस्बेनमध्ये १५ जानेवारीपासून खेळवला जाणार आहे.

भारतीय संघ : अजिंक्य रहाणे (कर्णधार), रोहित शर्मा, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, रिषभ पंत (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमरा, मोहम्मद सिराज, नवदीप सैनी.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा