Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
43,43,727
Recovered:
36,09,796
Deaths:
65,284
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
56,153
3,882
Maharashtra
6,41,596
57,640

ज्येष्ठ क्रिकेटर बापू नाडकर्णी यांचं निधन

भारताचे माजी अष्टपैलू क्रिकेटर बापू उर्फ रमेशचंद्र गंगाराम नाडकर्णी (Bapu nadkarni) यांचं मुंबईत वृद्धापकाळाने निधन (passed away) झालं. ते ८७ वर्षांचे होते. कसोटीत (test cricket) सलग २१ षटके निर्धाव टाकण्याचा विश्वविक्रम बापूंनी केला होता.

ज्येष्ठ क्रिकेटर बापू नाडकर्णी यांचं निधन
SHARES

भारताचे माजी अष्टपैलू क्रिकेटर बापू उर्फ रमेशचंद्र गंगाराम नाडकर्णी (Bapu nadkarni) यांचं मुंबईत वृद्धापकाळाने निधन (passed away) झालं. ते ८७ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी, जावई, नातू असा परिवार आहे. पवईतील हिरानंदानी गार्डन येथील मुलीच्या घरी त्यांची प्राणज्योत मालवली. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात कंजुश गोलंदाज अशी बापूंची ओळख होती.

बापू डाव्या हाताने फिरकी गोलंदाजी करायचे. स्टंपवर नाणे ठेवून नेटमध्ये बापू सराव करायचे. कसोटीत (test cricket) सलग २१ षटके निर्धाव टाकण्याचा विश्वविक्रम बापूंनी केला होता. १४ जानेवारी १९६४ रोजी इग्लंडविरुद्धच्या (england) सामन्यात बापूंनी ३२ षटकांपैकी तब्बल २७ षटके निर्धाव टाकली होती. ३२ षटकांत त्यांनी १.६७च्या सरासरीने केवळ ५ धावा दिल्या होत्या. बापूंचा हा विश्वविक्रम आजही अबाधित आहे. 

१९५५-५६ मध्ये फिरोजशहा कोटला मैदानावर (phirojshah kotla stadium) न्यूझीलंडविरुद्धच्या (new zealand) सामन्यात बापूंनी आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमध्ये पाऊल ठेवलं होतं. बापूंनी ४१ कसोटी सामन्यांत ८८ बळी टिपले होते. सोबतच १ शतक आणि ७ अर्धशतकांसह १ हजार ४१४ धावा करत त्यांनी अष्टपैलू म्हणूनही स्वत:ला सिद्ध केलं होतं.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा