Advertisement

तिसऱ्या वनडेत भारताचा एेतिहासिक विजय, मालिका खिशात

मेलबर्न वनडेत आॅस्ट्रेलियावर ७ गडी राखून विजय मिळवत भारताने मालिका खिशात घातली आहे. आॅस्ट्रेलियाच्या भूमीत मालिका खिशात घालण्याची सुवर्णसंधी भारतानं पहिल्यांदाच वनडे मालिका जिंकण्याचा कमाल करून दावखत नवा इतिहास रचला आहे.

तिसऱ्या वनडेत भारताचा एेतिहासिक विजय, मालिका खिशात
SHARES

मेलबर्न वनडेत आॅस्ट्रेलियावर ७ गडी राखून विजय मिळवत भारताने मालिका खिशात घातली आहे. आॅस्ट्रेलियाच्या भूमीत मालिका खिशात घालण्याची सुवर्णसंधी भारतानं पहिल्यांदाच वनडे मालिका जिंकण्याचा कमाल करून दावखत नवा इतिहास रचला आहे. या विजयानंतर भारतीय टीमवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि केदार जाधव यांच्या धडाकेबाज फलंदाजीच्या जोरावर भारतीय संघाने विजय मिळवला आहे. तर या विजयात युजवेंद्र चहल याचाही मोठा वाटा आहे.


२३१ धावांचा लक्ष्य

तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतासमोर ऑस्ट्रेलियानं विजयासाठी ठेवलेलं २३१ धावांचा लक्ष्य पार करताना रोहित शर्मा अवघ्या ९ धावांवर बाद झाला. त्यानंतर शिखर धवन आणि विराट कोहलीनं डाव सावरला. मात्र, संघाची धावसंख्या ५९ गेल्यावर शिखर २३ धावांवर बाद झाला आणि विराट ४६ धावा करून बाद झाला.


अनुभवी फलंदाजी

पहिले तीन खेळाडू माघारी परतल्यानंतर अनुभवी धोनीनं आपल्या फलंदाजीच्या जोरावर सामना विजयाच्या दिशेनं नेला. तसंच, विराट बाद झाल्यानंतर मैदानात आलेल्या केदार जाधवने देखील धोनीला चांगली साथ दिली. धोनीने ११४ चेंडूत ८७ आणि केदार जाधवने ५७ चेंडूत ६१ धावांची खेळी केली. त्याचप्रमाणं धोनी आणि केदारने दमदार फलंदाजी करत भारताला २३१ धावांचे लक्ष्य पुर्ण केलं.


आॅस्ट्रेलियात कमाल

भारताचा हा आॅस्ट्रेलिया दौरा एेतिहासिक राहिला. या दौर्यात भारतीय खेळाडूंनी अनेक विक्रम आपल्या नावावर नोंदवतानाच कसोटी मालिका आणि वनडे मालिका जिंकत इतिहास रचला आहे. आॅस्ट्रेलियाच्या भूमीत तब्बल ७२ वर्षांनी कसोटी मालिका जिंकण्याची कमाल भारताने दाखवली आहे. तर वनडे मालिका खिशात घालण्याची कमाल तर भारताने पहिल्यांदाच आॅस्ट्रेलियाच्या भूमीत दाखवली आहे. त्यामुळे हा दौरा तमाम क्रिकेटप्रेमींच्या कायमचा लक्षात राहणार यात वाद नाही.



हेही वाचा -


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा