Advertisement

टीम इंडिया आता टी-२० रँकिंगमध्ये दुसऱ्या क्रमांकावर

पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेत न्यूझीलंडने ऑस्ट्रेलियाचा ३-२ ने पराभव केला. त्यानंतर ऑस्ट्रेलिया संघ तिसऱ्या स्थानावर घसरला आहे.

टीम इंडिया आता टी-२० रँकिंगमध्ये दुसऱ्या क्रमांकावर
SHARES

भारतीय क्रिकेट संघ आता आयसीसी टी-२० रँकिंगमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आला आहे. कसोटी क्रिकेटमध्ये भारताने प्रथम स्थान आधीच काबीज केलं आहे. तर एकदिवसीय क्रिकेटमध्ये दुसऱ्या स्थानावर आहे.

पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेत न्यूझीलंडने ऑस्ट्रेलियाचा ३-२ ने पराभव केला. त्यानंतर ऑस्ट्रेलिया संघ तिसऱ्या स्थानावर घसरला आहे. भारतापेक्षा ऑस्ट्रेलिया फक्त एका गुणाने मागे आहे. टी-२० रँकिंगमध्ये इंग्लंड पहिल्या क्रमांकावर आहे. इंग्लंड भारतापेक्षा सात गुणांनी पुढे आहे. भारत आणि इंग्लंडमध्ये लवकरच पाच सामन्यांची टी-२० मालिका होणार आहे. यावेळी भारताला गुणांचं हे अंतर कमी करण्याची संधी आहे.

 ऑस्ट्रेलियाचा कर्णधार अॅरॉन फिंच टी-२० फलंदाजांच्या रँकिंगमध्ये दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. तर के एल राहुल पहिल्या स्थानावरुन तिसऱ्या क्रमांकावर घसरला आहे. भारतीय कर्णधार विराट कोहली सहाव्या स्थानी कायम आहे.

टी-२० गोलंदाजांच्या रँकिंगमध्ये अफगाणिस्तानचा राशीद खान पहिल्या क्रमांकावर आहे. तर मोहम्मद नबी अष्टपैलू खेळाडूंमध्ये अव्वल आहे. टी-२० गोलंदाज आणि अष्टपैलू खेळाडूंच्या रँकिंगमध्ये एकाही भारतीय खेळाडूचा समावेश नाही. 

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा