Advertisement

न्यूझीलंड दौऱ्यासाठी भारतीय संघ जाहीर; रोहितचं पुनरागमन


न्यूझीलंड दौऱ्यासाठी भारतीय संघ जाहीर; रोहितचं पुनरागमन
SHARES

भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात होणाऱ्या टी-२० मालिकेसाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं (बीसीसीआय) भारतीय क्रिकेट संघाची घोषणा केली आहे. भारतीय संघाचा नववर्षातील पहिला परदेश दौरा असून, जानेवारी महिन्याच्या अखेरीस भारतीय संघ न्यूझीलंड दौऱ्यावर जाणार आहे. याच्यातील टी-२० मालिकेसाठी रविवारी रात्री उशिरा बीसीसीआयनं भारतीय संघ जाहीर केला.

बीसीसीआयनं रविवारी रात्री उशिरा केलेल्या संघाच्या घोषणेनुसार आताच्याघडीला फॉर्मात असलेल्या सलामीवीर रोहित शर्माने संघात पुनरागमन केले आहे. टी-२० मालिकेसाठी कर्णधारपद विराट कोहलीकडेच असून, रोहित शर्मा उपकर्णधार असणार आहे. मात्र, एकदिवसीय सामने आणि कसोटी सामन्यांसाठी भारतीय संघाची घोषणा अद्याप करण्यात आलेली नाही.

न्यूझीलंड दौऱ्यावर असताना भारतीय संघ ५ सामन्यांची टी-२० मालिका, ३ एकदिवसीय सामन्यांची मालिका आणि २ कसोटी सामने खेळणार आहे. यष्टीरक्षणाची जबाबदारी ऋषभ पंतच्या खांद्यावर देण्यात आली आहे. दरम्यान, हार्दिक पंड्या दुखापतग्रस्त असल्यानं त्याला संघात स्थान देण्यात आलेलं नाही.

भारतीय संघः

विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), लोकेश राहुल, शिखर धवन, श्रेयस अय्यर, मनिष पांडे, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), शिवम दुबे, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, नवदीप सैनी, रविंद्र जाडेजा व शार्दुल ठाकूर.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा