Advertisement

हार्दिक पंड्याची फटकेबाजी अपयशी, कोलकाता ३४ धावांनी विजयी


हार्दिक पंड्याची फटकेबाजी अपयशी, कोलकाता ३४ धावांनी विजयी
SHARES

मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स यांच्यात झालेल्या सामन्यात कोलकातानं ३४ धावांनी मुंबईचा पराभव केला आहे. कोलकातानं प्रथम फलंदाजी करत मुंबईसमोर २३३ धावांचे दमदार आव्हान ठेवलं होतं. या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईला धावा करता आल्या. या सामन्यात कोलकताचे सलामीवीर फलंदाज  . ख्रिस लिन आणि शुभमन गिल या दोघांनीही अर्धशतकी खेळी करत संघाला चांगली सुरुवात करून दिली. लिननं २९ चेंडूंत ५४ धावांची खेळी साकारली, तर गिलनं ४५ चेंडूंत ६ चौकार आणि ४ षटकारांच्या जोरावर ७६ धावा काढल्या.


२३३ धावांच आव्हान

नाणेफेक जिंकून मुंबईनं प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, मुंबईच्या गोलंदाजांना या सामन्यात चांगली गोलंदाजी करता आली नाही. कोलकाताच्या फलंदाजांनी धमाकेदार फलंदाजी केली. लिननं २९ चेंडूंत ५४ धावांची खेळी केली, तर गिलनं ४५ चेंडूंत ६ चौकार आणि ४ षटकारांच्या जोरावर ७६ धावा केल्या. त्यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या रसेलनं नाबाद ८० धावांची खेळी केली. त्यानं ४० चेंडूंत ६ चौकार आणि ८ षटकारांच्या जोरावर ८० धावा करत मुंबईसमोर २३३ धावांच आव्हान ठेवलं. 


९१ धावांची खेळी 

केकेआरच्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईच्या फलंदाजांना चांगली सुरुवात करता आली नाही. पण हार्दिक पंड्यानं एकट्यानं मुंबईचा किल्ला लढवला. त्यानं ९१ धावांची खेळी करत मुंबईचे आव्हान जीवंत ठेवले होते. पण हार्दिकला अन्य फलंदाजांची साथ न मिळाल्यानं मुंबईला विजय मिळवता आला नाही. त्यामुळे हार्दिकची ही झुंजार खेळी व्यर्थ ठरली. हार्दिकनं ३४ चेंडूंत ६ चौकार आणि ९ षटकार मारत ९१ धावांची तुफानी खेळी साकारली.


प्रथम गोलंदाजी

मुंबईनं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. यावेळी गोलंदाजी करताना राहुल चहर आणि हार्दिक पंड्या यांनी प्रत्येकी १-१ विकेट्स घेतल्या. त्याचप्रमाणं, कोलकाताकडून नरीन, गर्नि आणि रसेल यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. तसंच, पियुष चावला यानं १ विकेट घेतली.

संबंधित विषय
Advertisement