Advertisement

IPL 2021: मुंबई इंडियन्सचा मलिंगासह 'या' खेळाडूंना सोडचिठ्ठी

इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) १३ व्या पर्वात मुंबई इंडियन्सनं पाचव्यांदा विजेतेपद पटकावलं.

IPL 2021: मुंबई इंडियन्सचा मलिंगासह 'या' खेळाडूंना सोडचिठ्ठी
SHARES

इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) १३ व्या पर्वात मुंबई इंडियन्सनं पाचव्यांदा विजेतेपद पटकावलं. मुंबईनं रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली २०१९ आणि २०२० अशी दोन्ही विजेतेपदे सलग जिंकली. मुंबईकडून अनेक खेळाडूंना खेळण्याची संधी मिळाली. पण काही खेळाडूंना संधी मिळू शकली नाही. अशातच आता आयपीएलच्या १४ व्या पर्वाचं बिगूल वाजलं असून, अनेक खेळाडूंना संघ मालकान करारमुक्त केलं आहे. यामध्ये मुंबई इंडियन्सनं लसिथ मलिंगा, मिचेल मॅक्लेनेघन यांसारख्या बड्या नावांना सोडचिठ्ठी दिली.

मुंबई इंडियन्सनं आयपीएल २०२१ साठी रोहित शर्मा, हार्दिक पांड्या, कायरन पोलार्ड, सूर्यकुमार यादव, जसप्रीत बुमराह, ट्रेंट बोल्ट या मॅचविनर खेळाडूंना संघात कायम राखलं आहे.

कायम राखलेले खेळाडू

रोहित शर्मा, क्विंटन डी कॉक, सूर्यकुमार यादव, ईशान किशन, ख्रिस लिन, अनमोलप्रीत सिंग, सौरभ तिवारी, आदित्य तारे, कायरन पोलार्ड, हार्दिक पांड्या, कृणाल पांड्या, अनुकुल रॉय, जसप्रीत बुमराह, ट्रेंट बोल्ट, राहुल चहर, जयंत यादव, धवल कुलकर्णी, मोहसीन खान.

करारमुक्त केलेले खेळाडू

लसिथ मलिंगा, मिचेल मॅक्लेनेघन, जेम्स पॅटिन्सन, नॅथन कुल्टर-नाईल, शेरफाने रूदरफर्ड, प्रिन्स बलवंत राय, दिग्विजय देशमुख.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा