Advertisement

जाँटी ऱ्होड्सचा मुंबई इंडियन्सला अलविदा, जेम्स पॅमेंट नवे कोच


जाँटी ऱ्होड्सचा मुंबई इंडियन्सला अलविदा, जेम्स पॅमेंट नवे कोच
SHARES

२००९ पासून मुंबई इंडियन्सचा एक अतूट भाग असलेला क्षेत्ररक्षक प्रशिक्षक जाँटी ऱ्होड्सने अायपीएलमधील या संघाला अलविदा केला अाहे. तीन वेळा अायपीएलचे जेतेपद पटकावणाऱ्या मुंबई इंडियन्सने अाता क्षेत्ररक्षक प्रशिक्षक म्हणून न्यूझीलंडच्या जेम्स पॅमेंट यांची नियुक्ती केली अाहे.

गेले ९ मोसम मुंबई इंडियन्ससोबत असणाऱ्या जाँटीने अापल्या व्यवसायात लक्ष केंद्रित करण्यासाठी मुंबई इंडियन्सला अलविदा केला अाहे. मुंबई इंडियन्ससाठी जाँटी यांनी दिलेले योगदान मौल्यवान अाहे, अशा शब्दांत मुंबई इंडियन्सचे मालक अाकाश अंबानी यांनी जाँटी ऱ्होड्सचे अाभार मानले अाहेत.


मुंबई इंडियन्सच्या क्षमतेचा अाणि उर्जेचा जाँटी हा एक पिलर होता. जाँटी ऱ्होड्स यांचे योगदान शब्दांत मांडता येण्यासारखे नाही. त्यांनी घेतलेल्या निर्णयाचा अाम्ही अादर राखतो अाणि त्यांना भविष्यासाठी शुभेच्छा देतो. जाँटी ऱ्होड्स हे यापुढेही मुंबई इंडियन्स परिवाराचा एक भाग असतील.
- अाकाश अंबानी, मुंबई इंडियन्सचे मालक

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा