Advertisement

'सुपर' संडे! अखेर दुसऱ्या 'ओव्हर'मध्ये पंजाबचा विजय

मुंबई इंडियन्स (mumbai indians) विरुद्ध किंग्ज इलेव्हन पंजाब (kings xi panjab) यांच्यातील दुसरा सामना अत्यंत लढतीचा पाहायला मिळाला. या सामन्यात दोनदा सुपरओव्हर खेळविण्यात आली.

'सुपर' संडे! अखेर दुसऱ्या 'ओव्हर'मध्ये पंजाबचा विजय
SHARES

मुंबई इंडियन्स (mumbai indians) विरुद्ध किंग्ज इलेव्हन पंजाब (kings xi panjab) यांच्यातील दुसरा सामना अत्यंत लढतीचा पाहायला मिळाला. या सामन्यात दोनदा सुपरओव्हर खेळविण्यात आली. पहिल्या सुपर ओव्हरमध्ये (super over) सामना बरोबरीत होता. त्यामुळे पुन्हा दुसरी सुपर ओव्हर खेळवण्यात आली. दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये मुंबईची प्रथम फलंदाजी होती. मुंबईला यावेळी ११ धावा करता आल्या. त्यामुळे विजयासाठी पंजाबपुढे १२ धावांचे आव्हान होते. मात्र पंजाबनं हे आवाहन सहज पार केलं असून सामन्यात दमदार विजय मिळविला.

पहिल्या सुपर ओव्हरमध्ये मुंबईची प्रथम गोलंदाजी होती. मुंबईच्या जसप्रीत बुमरानं यावेळी सुपर ओव्हरमध्ये भेदक मारा केला आणि त्यामुळे पंजाबचा एक फलंदाज गमावून ५ धावा करता आल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईच्या फलंदाजांना ५ धावाच करता आल्या. त्यामुळे सुपर ओव्हरमध्ये हा सामना बरोबरी झाला आणि दुसरी सुपर ओव्हर खेळवण्यात आली. दुसऱ्या सुपरओव्हरमध्ये हार्दिक पांड्या आणि कायरन पोलार्ड जोडी मैदानात उतरली. पोलार्डने फटकेबाजी करत मुंबईला दुसऱ्या सुपरओव्हरमध्ये ११ धावा काढून दिल्या. विजयासाठी आवश्यक असलेल्या १२ धावांचं आव्हान पंजाबकडून ख्रिस गेल आणि मयांक अग्रवाल मैदानात उतरले.

मुंबईनं ट्रेंट बोल्टला दुसरी सुपरओव्हर टाकण्याची संधी दिली. यावेळी बोल्टच्या पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकत गेलने धडाकेबाज सुरुवात केली. यानंतर मयांक अग्रवालनं चौकार मारत सामना पंजाबच्या नावावर केला.

या सामन्यात मुंबईनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला व पंजाबसमोर विजयासाठी १७७ धावांचं आव्हान ठेवलं. मुंबईच्या १७७ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पंबाजला चांगली सुरुवात करता आली नाही. कारण मुंबईच्या जसप्रीत बुमराने यावेळी मयांक अगरवालला बाद केला, मयांकला यावेळी ११ धावा करता आल्या.

मयांक बाद झाल्यावर ख्रिस गेल आणि कर्णधार लोकेश राहुल यांची चांगलीच जोडी जमली. मात्र हे दोघेही बाद झाल्यावर राहुल यावेळी दमदार फटकेबाजी करत होता. राहुलला यावेळी काही काळ निकोलस पुरनची चांगली साथ मिळाली. पण यावेळी पुन्हा एकदा बुमराने मुंबईला तिसरे यश मिळवून दिले. बुमराने यावेळी पुरनला बाद केले, पुरनने यावेळी १२ चेंडूंत २४ धावा केल्या. परंतु, बुमराने राहुलला बाद करत मुंबईला मोठे यश मिळवून दिले. राहुलने यावेळी ५१ चेंडूंत सात चौकार आणि तीन षटकारांच्या जोरावर ७७ धावांची खेळी साकारली.

प्रथम फलंदाजी करताना मुंबईच्या क्विंटन डीकॉकचे अर्धशतक आणि अखेरच्या षटकांमध्ये पोलार्डनं केलेल्या जोरदार फटकेबाजीच्या जोरावर मुंबई इंडियन्सला या सामन्यात पंजाबपुढं १७७ धावांचं आव्हान ठेवता आलं. फलंदाजी करताना मुंबईची सुरुवात चांगली झाली नव्हती. त्यांची ३ बाद ३८ अशी अवस्था होती. पण त्यानंतर क्विंटन डीकॉकनं अर्धशतक झळकावत मुंबईच्या संघाला चांगला आकार दिला. त्यानंतर अखेरच्या षटकांमध्ये किरॉन पोलार्ड आणि नॅथन कल्टर-नाइल यांनी तुफानी फटकेबाजी केली. पोलार्डने यावेळी १२ चेंडूंत १ चौकार आणि चार षटकारांच्या जोरावर नाबाद ३४ धावा केल्या, तर नॅथनने चार चौकारांच्या जोरावर १२ चेंडूंत नाबाद २४ धावा केल्या.  डीकॉकने यावेळी ४३ चेंडूंत तीन चौकार आणि तीन षटकारांच्या जोरावर ५३ धावांची खेळी साकारली.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा