माटुंगा केंद्र आणि माहुल केंद्र अंतिम फेरीत दाखल

  Dadar
  माटुंगा केंद्र आणि माहुल केंद्र अंतिम फेरीत दाखल
  मुंबई  -  

  माटुंगा जिमखाना ग्राउंड येथे न्यू हिंद स्पोर्टिंग क्लब आयोजित 27 व्या 'एलआयसी कल्पेश कोळी क्रिकेट स्पर्धे'च्या चषकावर नाव कोरण्यास माटुंगा केंद्र आणि माहुल केंद्र हे दोन संघ सज्ज झाले आहेत.

  गुरूवारी झालेल्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना माटुंगा केंद्राने 6 बाद 209 अशी धावसंख्या रचली. त्याला उत्तर देण्यासाठी मैदानात उतरलेल्या गोरेगाव केंद्राला केवळ 149 धावांपर्यंतच मजल मारता आली. माटुंग्याचा फलंदाज शुभम मेस्त्री (74 धावा) आणि आर्यन पोळ (34 धावा) यांचा अपवाद वगळता कुणालाही खेळपट्टीवर फारकाळ टिकाव धरला आला नाही. माटुंगा केंद्राचा फिरकी गोलंदाज हर्षल जाधव याने 23 धावांत 4 बळी घेत गोरेगाव केंद्राला 149 धावात गुंडाळून संघाला अंतिम सामन्यात प्रवेश मिळवून दिला. त्याला मुशीर खान (31 धावांत 3 बळी) ची चांगली साथ मिळाली. हर्षलला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.

  त्याआधी झालेल्या कांदिवली केंद्र विरुद्ध माहुल केंद्र यांच्या सामन्यात माहुल केंद्राने 201 धावा केल्या. त्यात हर्ष राणे (40 धावा) आणि आदित्यन देव (52 धावा) यांनी महत्त्वाचे योगदान दिले. या धावसंख्येला प्रत्युत्तर देताना कांदिवली केंद्राला केवळ 177 धावा करता आल्या. निशांत कदम 26 धावांत 3 बळी, सुर्यांश शेडगे 38 धावांत 2 बळी, परिक्षित धनक 35 धावांत 2 बळी आणि आर विजय 41 धावांत 2 बळी घेऊन संघाला विजय मिळवून दिला.

  अंतिम सामना 27 आणि 28 मे 2017 ला न्यू हिंद स्पोर्टिंग क्लब, माटुंगा येथे होणार आहे.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.